मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १७ हजार ९७४ वर पोहोचली आहे. दिवसभरात १ हजार २१६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच राज्य शासनाने कोरोनाच्या लढाईसाठी नियुक्त केलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे.
याबाबत बोलताना डॉ. संजय ओक म्हणाले, ‘कोव्हिडने संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच ढवळून काढली आहे. आजवरचे हे सर्वांत बिकट आव्हान आहे.
पुढील एक-दोन आठवड्यात कोरोनाचे अधिक रुग्ण मुंबईत पहावयास मिळतील,अशी भीती ओक यांनी येथे व्यक्त केली.
पुढील काही महिन्यात कोरोना प्लस मलेरिया, कोरोना प्लस डेंगू अशा आजारांची शक्यता नाकारता येत नाही. पुढचे दोन-तीन महिने आरोग्य विभागासाठी आव्हानात्मक असतील’.अशी भीती ओक यांनी येथे व्यक्त केली.