ठाणे महापालिकेच्या ९ प्रभागांमध्ये १७ ठिकाणी होलसेल मार्केट सुरु - : ठाणे महापालिका आयुक्तांचा निर्णय

 


ठाणे महापालिकेच्या ९ प्रभागांमध्ये १७ ठिकाणी होलसेल मार्केट सुरु  - : ठाणे महापालिका आयुक्तांचा निर्णय


जांभळी नाका होलसेल भाजीपाला बंद राहणार.


ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील नौपाडा प्रभागामधील जांभळी नाका येथील होलसेल भाजीपाला मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यामुळे पालिकेच्या ९ प्रभागांमध्ये १७ ठिकाणी होलसेल मार्केट सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी आज घेतला आहे.


 कोव्हीड - १९ वर नियंत्रण आणण्याससाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ठाणे शहरामध्ये नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी व सोशल डिस्टन्सची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जांभळी नाका येथील होलसेल भाजीपाला मार्केट बंद करण्यात येत असून पालिकेच्या ९ प्रभागांमध्ये १७ ठिकाणी होलसेल मार्केट सुरु करण्यात येत आहे. सदर होलसेल मार्केटच्या परिसरातील किरकोळ व्यापारी यांनी त्या ठिकाणी जाऊन भाजीपाला खरेदी करावयाचा आहे. त्या परिसरातील किरकोळ व्यापा - यांव्यतिरिक्त अन्य नागरिकांना या मार्केटमध्ये जाता येणार नाही.
            या ठिकाणी होलसेल व्यापारी व त्यांचे कामगार व किरकोळ व्यापारी यांनी सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे. तसेच या ठिकाणी होलसेल व्यापारी यांनी किरकोळ व्यापारी यांनाच भाजीपालाची विक्री करावी अन्य कोणासही भाजीपाला विक्री करण्यात येणार नाही. तसे आढळल्यास होलसेल व्यापा - यांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.या ठिकाणी नियंत्रक अधिकारी यांच्याकडून होलसेल व्यापा-यांना ओळखपत्र पाहूनच बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
              प्रभाग समितीनिहाय मार्केट ठिकाणांमध्ये उथळसर प्रभागसमिती मध्ये साकेत पोलीस मैदान, अनिल जाधव मैदान, वृंदावन शेवटचा बसस्टॉप, मुंब्रा प्रभागसमिती मध्ये बाहुबली मैदान, जैन मंदिर मुंब्रा पोलीस स्टेशन समोर, मित्तल मैदान, दिवा प्रभाग समिती मध्ये दिवा महोत्सव मैदान , दिवा आगासन रोड, छत्रपती क्रीडा मैदान ,बीसयूपी जवळ, पडले गाव, वागळे प्रभाग समिती रामनगर पाण्याच्या टाकीजवळील मैदान, साईनाथ मंदिर मैदान, माजीवडा प्रभाग समितीमध्ये खेळाचे मैदान आरक्षण क्र4, ज्ञानगंगा कॉलेजजवळ,बोरीवडे आनंदनगर परिसर घोडबंदर, वाघबीळ टीजेएसबी समोरचे मैदान, कावेसर कॉसमॉस पार्कसमोर, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमध्ये भगवती शाळा मैदान शाहू मार्केटजवळ, वर्तकनगर प्रभागसमितीमध्ये उन्नती मैदान, देवदयानगर रोड शिवाईनगर, निहारिया मैदान, घाणेकर नाट्यगृहजवळ, लोकमान्य नगर प्रभाग समिती मध्ये सचिन तेंडुलकर मैदान, महात्मा फुलेनगर, सावरकर नगरशाळा क्र. 120 मैदान आणि कळवा प्रभाग समितीमध्ये पारसिक रेतीबंदर मैदान, 90 फूट रस्ता खारेगाव,पारसिक नगर या ठिकाणी होलसेल मार्केटची व्यवस्था करण्यात आली आहे.
             सदर आदेशाचे उल्लंगन करणारी व्यक्ती, संस्था महाराष्ट्र साथ रोग प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७, महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम २०२० चे नियम ११ नुसार व भारतीय दंड संहिता ( ४५ 31 कलम १८८ मधील तरतुदीनुसार दंडनीय व कायदेशीर कारवाईस पात्र राहतील . तसेच महाराष्ट्र महा अधिनियमानुसार नोंदणी करणे व इतर कायदेशीर कारवाईस पात्र राहतील.सोशल डिस्टन्स पाळण्याची जबाबदारी दुकानदारावर राहणार आहे.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image