ठरावा शिवाय ‘टंचाई निवारण्याचे’ कामे करता येणार. कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर ग्रामसभेच्या ठरावाची अट शिथिल.

 


निर्णयाची अमंलबजावणी करण्याचे ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांचे निर्देश*


ठाणे  -:  ठाणे जिल्ह्यातील अनेक गाव-पाडे वस्त्यांवर उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होते, ही परिस्थिती निवारण्यासाठी विविध पाणी टंचाई कामे हाती घेतली जातात. ही कामे करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव घेतला जातो. मात्र सध्यस्थितीत कोरोना विषाणूच्या साथीमुळे संचारबंदीचे पालन करणे तसेच वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई घोषित करण्यासाठी ग्रामसभेच्या ठरावाची अट चालू टंचाई कालावधीत २०१९-२० करिता शिथिल करण्यात आली आहे.  शासनाच्या या महत्वपूर्ण निर्णयाची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी कार्यकारी अभियंता ( ग्रामीण पाणी पुरवठा ) यांना दिले आहेत.


त्यामुळे आता ग्रामसभेच्या ठरावाऐवजी ग्रामपंचायतीचा ठराव अथवा संबंधित सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीच्या पत्राआधारे टंचाई घोषित करणे व त्यानुषंगिक कामे तातडीने करता येणार आहेत. या निर्णयामुळे टंचाईची कामे करण्यास मार्ग मोकळा  झाला असून त्यामुळे कामांना गती मिळणार आहे.


आजच्या घडीला जिल्ह्यात पाणी टंचाईची टँकरने पाणी पुरवठा करणे, नवीन विंधन विहीर घेणे, नळ पाणी पुरवठा दुरुस्ती करणे, विंधन विहिरींची दुरुस्ती करणे आदी कामे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून केली जात आहेत. कोरोनाच्या महामारीचा मुकाबला करताना जिल्ह्यात पाणी टंचाई निवारण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन जिल्हा प्रशासनाच्या साहाय्याने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सर्व अभियंता प्रयत्नशील आहेत.


*शहापूरच्या १९ गावे आणि ७७ पाड्यांवर टँकरने पाणी*


शहापूर तालुक्यातील १९ गावे आणि ७७ पाड्यांवर म्हणजे एकूण ९६ गाव-पाड्यांवर खाजगी स्वरूपात ट्रॅकरने सुरळीत पाणी पुरवठा सुरू आहे. या गाववाड्यांची साधारण ३० हजार ४९९ एवढी लोकसंख्या असून यासाठी दररोज २४ टँकरचा वापर केला जात आहे. अशी माहिती कार्यकारी अभियंता एच. एल. भस्मे यांनी दिली.


*१२ कोटी ६२ लाखाचा टंचाई आराखडा मंजूर*


दरवर्षी जिल्ह्यात टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे प्रशासन टंचाई आराखडा मंजूर करत असते. सन २०१९-२० चा १२ कोटी ६२ लाखांचा टंचाई आराखडा डिसेंबर महिन्यात मंजूर करण्यात आला आहे. या टंचाई आराखड्यातून टँकरने पाणी पुरवठा करणे, नवीन विंधन विहीर घेणे, नळ पाणी पुरवठा दुरुस्ती करणे, विंधन विहिरींची दुरुस्ती करणे आदी कामे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून केली जातात.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image