दिव्यांग व्यक्ती असणाऱ्या कुटुंबास अन्नधान्य व आर्थिक स्वरूपाची मदत मिळावी -दिव्यांगची मागणी.

 


ठाणे -: राज्यात करोना सारख्या महा विषाणुचा फैलाव जोरात सुरू आहे. करोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील नागरीक करत आहे,
त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जनता करफ्यु व लाॅक डाउन सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले असून त्याचा परिणाम आम्हा दिव्यांग बांधवांवर होत आहे. आमचे जिवन पूर्णपणे उध्वस्त होत आले असून याचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण वरील *संदर्भीय पत्र क्र. १* नुसार सर्व विभागीय आयुक्तांना दिव्यांग व्यक्तींना एक महिना पुरेल एवढे जीवनावश्यक वस्तूंचे जसे *धान्य, कडधान्य, डाळी, तेल, तांदूळ* इत्यादी वस्तूंचे वाटप करण्याचे स्पष्ट आदेश संबंधितांना देण्यात आलेले होते,,,परंतु सदर आदेशात *मोफत* हा शब्दाचा उल्लेख नसल्यामुळे संबंधित विभागाने आपण दिलेल्या आदेशाचा सोईनुसार अर्थ लावून *दिव्यांग व्यक्तींना हे सर्व साहित्य पैसे आकारून पुरवले जात असून* फक्त सदर साहित्य *दुकानातून आणून देण्याची सेवा* प्रदान केली जात आहे याची नोंद असावी,


*ठाणे मनपा हद्दीतील* ♿दिव्यांग व्यक्ती सध्या उपासमारीचे जीवन जगत असून भविष्यात अशीच परिस्थिती कायम राहिल्यास *भूकबळी* जाण्यापासून कोणीच रोखू शकत नसल्यामुळे आपण पुन्हा सर्व जिल्हापरिषद, नगरपालिका, जिल्हाधिकारी यांना स्पष्ट लेखी आदेश देऊन आम्हां *दिव्यांगांचे जीवन वाचवावे* ही पुन्हा  विनंती करण्यात आली आहे.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image