दिलासादायक !;राज्यात ७२२ रुग्ण कोरोनामुक्त, तिशी-पन्नाशीतील रूग्णांची संख्या सर्वाधिक - राजेश टोपे.

 


मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या 150 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, ही दिलासादायक बाब असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या 722 जणांपैकी पुरूषांची संख्या सर्वाधिक 441 असून 281 महिला आहेत. त्यामध्ये 31 ते 50 या वयोगटातील 318 रुग्णांचा समावेश आहे. त्या खालोखाल 21 ते 30 वयोगटातील 160 रुग्ण बरे झाले आहेत तर 98 रुग्ण हे 51 ते 60 वयोगटातील आहेत. लक्षणीय बाब अशी की 91 ते 100 वयोगटातील एका रुग्णाने कोरोनाला हरविण्यात यश मिळविले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.


दरम्यान, राज्यात जास्त रुग्ण मुंबई परिसरात आढळून येत असतानाच बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईची 374 एवढी आहे.त्यापाठोपाठ पुणे महापालिका परिसरात 120 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढतेय. 23 मार्चला पहिले दोन रुग्ण बरे होऊन घरी गेले.


त्यानंतर आतापर्यंत साधारणत: महिन्याभरात 722 रुग्ण घरी गेले आहेत. हे प्रमाण पाहता राज्यात दररोज सुमारे 26 रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. राज्यात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या सर्वाधिक असल्याने रुग्णांचे निदान होण्याची संख्याही वाढत आहे. मंगळवारपर्यंत राज्यात 83 हजार 111 नमुन्यांपैकी 77 हजार 638 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 5218 जण पॉझिटिव्ह आले आहेत.कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि त्यांचा वयोगट पाहता लक्षात येईल की साधारणता 31 ते 60 वयोगटातील 418 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यातील कोरोना मुक्त 722रुग्णांचा वयोगट आणि कंसात बरे झालेल्यांची संख्या – शून्य ते 10 (19); 11 ते 20 (59) ; 21 ते 30 (160); 31 ते 40 (164); 41 ते 50 (154); 51 ते 60 (98); 61 ते 70 (45); 71 ते 80 (15); 81 ते 90 (7); 91 ते 100 (1).


*घरी सोडण्यात आलेल्या 722 रुग्णांची जिल्हा :*


*मनपा निहाय संख्या खालील प्रमाणे :*


अहमदनगर मनपा- 5
अहमदनगर ग्रामीण-11
औरंगाबाद मनपा- 14
बुलढाणा- 8
गोंदीया, हिंगोली, जळगाव मनपा प्रत्येकी -1
कल्याण-डोंबिवली मनपा- 31
कोल्हापूर मनपा- 2
लातूर ग्रामीण- 8
मीरा भाईंदर मनपा- 5
मुंबई मनपा- 374
नागपूर मनपा- 12
नाशिक मनपा व ग्रामीण प्रत्येकी – 1
नवी मुंबई मनपा- 19
उस्मानाबाद- 3
पालघर ग्रामीण- 1
पनवेल मनपा- 13
पिंपरी-चिंचवड मनपा- 12
पुणे मनपा- 120
पुणे ग्रामीण- 5
रायगड ग्रामीण-3
रत्नागिरी-1
सांगली ग्रामीण- 26
सातारा- 3
सिंधुदूर्ग-1
ठाणे मनपा- 16
ठाणे ग्रामीण- 3
उल्हासनगर मनपा- 1
वसई-विरार मनपा- 12
यवतमाळ- 7


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image