कोरोनाबाधित पत्रकारांना भाजपच्या वतीने सर्वतोपरी मदत करु. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचे आश्र्वासन.

 


मुंबई :- मुंबईतील काही पत्रकारांना कोरोनाची लागण झाली, हे अतिशय धक्कादायक आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्वतोपरी मदत करु, असे आश्र्वासन भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. तसेच, राज्यातील विशेष करुन मुंबईतील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता इलेक्ट्रॉनिक व प्रिंट माध्यमांच्या पत्रकारांना घरातून काम करण्यासाठी संबंधित वृत्तवाहिन्यांच्या मालकांनी व संपादकांनी परवानगी देण्यासंदर्भात राज्य सरकारने सूचना द्याव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.



श्री. पाटील म्हणाले की, राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही चिंताजनक आहे. त्यातही लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना ही कोरोना संक्रमण होणं, हे अतिशय धक्कादायक आहे. भारतीय जनता पक्ष पत्रकारांच्या पाठिशी उभे असून, कोरोना संक्रमित पत्रकारांना पक्षाच्यावतीने आवश्यक ती सर्व मदत करु, असे त्यांनी आश्र्वासन दिले.


ते पुढे म्हणाले की, "इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचा वार्ताहर, छायाचित्रकार हे थेट कोरोनाबधितांशी थेट भिडत असतात. त्यामुळे मुंबईत कोरोना संक्रमणामुळे जे पत्रकार रुग्णालयात दाखल झाले आहेत. अशा पत्रकारांना त्यांच्या मालकांनी त्यांचा पुढील तीन महिन्यांचा पगार द्यावा, यासाठी सरकारने त्यांना सूचित करावे. इलेक्ट्रॉनिक व प्रिंट माध्यमांच्या मालकांनी पगार देण्यासाठी असमर्थता दर्शविल्यास भाजपा यासाठी पुढाकार घेईल. 


तसेच राज्यातील विशेष करुन मुंबईतील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पत्रकारांना वर्क फ्रॉम होमसाठी संबंधित दैनिक व वृत्तवाहिन्यांच्या मालकांना व संपादकांना राज्य सरकारने सूचना द्याव्यात" अशी मागणी ही श्री. पाटील यांनी केली.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image