महाराष्ट्रात ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे.

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी लॉक डाऊनची महत्वपूर्ण घोषणा केली असून महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे.
महाराष्ट्रात रूग्णांची संख्या वाढतच असून आपल्याला महाराष्ट्रातून कोरोनाला संपूर्णपणे हद्दपार करावयाचे आहे. जीवनावश्यक सेवा व कृषी विषयक सेवा पूर्णपणे सुरू राहणार असून आतापर्यंत महाराष्ट्रातील जनतेने या संकटाचा मोठ्या हिंमतीने सामना केला आहे.
आज संपूर्ण जगावर व देशावर संकट आले असताना अशा परिस्थितीतही महाराष्ट्र सर्वांना दिशा दाखवण्याचे काम करणार आहे. त्यामुळे यापुढेही जनतेने सहकार्य करून कुठेही गोंधळ न करता कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी हातभार लावावा. कोरोना विषाणूच्या चैनला म्हणजेच साखळदंडाला तोडण्याचे धैर्य आपणाला दाखवायचे आहे. त्यामुळे नाईलाजाने किमान 30 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज केली.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image