सफाई कामगारांकडे दुर्लक्ष नको- महेश कांबळे

 


ठाणे - कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने सध्या राज्यातील तसेच ठाणे जिल्ह्यातील सफाई कामगारांवर सर्वाधिक कामाचा ताण पडत आहे. परंतु  स्वच्छतेचे काम करत असताना त्यांना आवश्यक असलेली  साधनसामुग्री उपलब्ध करून दिलेली नाही. त्यांना मास्क, शूज,  हँडग्लोव्हज व सॅनिटायझर्स तातडीने उपलब्ध करून दिले पाहिजेत.  त्याच बरोबर त्यांना 3 महिन्याचे संपुर्ण रेशन मोफत दिले पाहिजे . वैद्यकिय सेवक व पोलिसां प्रमाणे यांनाही योग्य रकमेची  विमा सुरक्षा मिळाली पाहिजे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. म्हणून या कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सामुग्रीचा तातडीने पुरवठा झाला पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या ठाणे जिल्हा अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष महेश कांबळे यांनी  महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.


आज आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना शक्य तितक्या सोयीसुविधा दिल्या जात आहेत. परंतु नेहमीच शहराची किंवा परिसराची साफसफाई करणारा हा कर्मचारी वर्ग दुर्लक्षित राहातो. त्याला आपल्या रोजगाराची चिंता असल्याने तो या सर्व उणिवा असूनही काम करीत राहतो. आजची परिस्थिती ही विचित्र असल्याने त्यांना स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करावे लागत आहे. समाजाच्या सुरक्षिततेसाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या या सफाई कामगारांकडे तितक्याच संवेदनशीलतेने पाहिले गेले पाहिजे. मुंबई आणि ठाण्यामध्ये लॉकडाऊन जरी असले तरी शेकडो टन कचरा गोळा होत आहेत. त्यांची ही परिस्थिती नीट समजून घेतली पाहिजे. इतरवेळीसुध्दा स्वच्छता मोहीमेचा बराच गाजावाजा होत असतो. पण ही मोहीम ज्यांच्यामुळे यशस्वी होते त्या सफाई कामगारांच्या वेतनापासून ते सुरक्षिततेपर्यंत सगळ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष होते. पुरेशा सुविधा नसल्यामुळे अनेक सफाई कामगारांना वेगवेगेळ्या प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. कोरोनासारख्या साथीच्या काळात त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.



Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image