देशाला इतकेही मुर्खात काढू नका - आमदार जितेंद्र आव्हाड

 


सोचा था चूल्हा जलाने की बात हो गी साहब दिया जलाने का उपदेश दे गए' - नवाब मालिक.
ठाणे :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मेणबत्ती लावून करोनाविरुद्धची सामूहिक शक्ती दाखवण्याचं आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी तात्काळ ट्विट करत मोदींच्या या आव्हानाची खिल्ली उडवली आहे. मला वाटलं मोदी आजच्या संदेशात वेगळं काही सांगतील. भारताने करोनाविरुद्धची लस शोधली, एकालाही मास्कची कमतरता पडू देणार नाही, देशासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरच्या मागे आम्ही उभे आहोत, लॉकडाऊनच्या काळात एकही गरीब उपाशी झोपणार नाही, असं काही तरी सांगणं मोदींकडून अपेक्षित होतं. पण यांनी तर संकटाच्या काळातही इव्हेंट करायचं ठरवलं आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
म्हणे, अंधार करा आणि बॅटरी पेटवा. मोदीजी देशाला इतकेही मुर्खात काढू नका, असा हल्लाही आव्हाड यांनी चढवला आहे. ही टीका करताना आव्हाड यांनी 'नागिन' या जुन्या हिंदी चित्रपटातील कलाकारांचा हातात टॉर्च घेतलेला फोटोही पोस्ट केला आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये 'नव्या निरोचा जन्म' आणि 'अंधेरी रात में दिया तेरे हाथ में', असं ट्विटही त्यांनी केलं आहे.
पंतप्रधानांनी रविवारी सर्वांना संध्याकाळी दिवे किंवा मेणबत्ती लावून करोना विरुद्धची सामूहिक शक्ती दाखवण्याचं आवाहन केलं आहे. त्यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. देशाला इतकेही मुर्खात काढू नका. मोदींनी तर संकटातही इव्हेंट करायचं ठरवलंय, अशी टीका करतानाच देशात नव्या निरोचा जन्म झालाय, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर हल्ला चढवला आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना यामध्ये आतापर्यंत ७० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना सांगितले की, कोरोनाच्या संकटाविरुद्ध लढाईला प्रकाशित करत हे तेज आपल्या चारही दिशांना पसरवायचं आहे. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता. घरातील सर्व लाईट्स बंद करा, दरवाजे आणि बालकनीत उभं राहून दिवा, मेणबत्ती, टॉर्च अथवा मोबाईलची फ्लॅश लाईट सुरु करा. असं आवाहन नरेंद्र मोदींनी केले. त्यावर सर्वच स्तरातून टीका होऊ लागली आहे.


याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते तसेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी निशाणा साधला आहे. ट्रिट करुन त्यांनी म्हटलंय की, सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी घोर निराशा केली आहे. सोचा था चूल्हा जलाने की बात हो गी साहब दिया जलाने का उपदेश दे गए' अशा शब्दात त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. यापूर्वीही नरेंद्र मोदींच्या टाळी आणि थाळी नादावर विरोधकांनी टीका केली होती. त्याचसोबत देशात २२ मार्चला लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. रात्री उशीरा ८ वाजता पंतप्रधानांनी देशाला संबोधित करत मध्यरात्रीपासून देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्याची घोषणा केली मात्र लॉकडाऊन म्हणजे नोटाबंदी नव्हे असं सांगत मंत्री जयंत पाटील यांनी मोदींच्या धोरणावर टीका केली होती.


लॉकडाऊन सकाळी जाहीर केले असते तर लोकांना त्रास झाला नसता असं मत त्यांनी मांडले. लॉकडाऊनमुळे देशातील मजुरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.शेकडो कामगार गावच्या दिशेने पायपीट करु लागले. रस्त्यावर कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने मुलाबाळांसह सर्व कुटुंब रस्त्यावरुन चालताना दिसले. नियोजन न करता मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली त्यामुळे हजारो मजुरांवर रस्त्यावर राहण्याची वेळ आली असं विरोधकांनी सुनावलं होतं. त्यानंतर आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी या लोकांना दिलासा देणाऱ्या घोषणा करतील अशी आशा विरोधकांना लागली होती पण तसं काही न झाल्याने विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.


 


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image