ठाणे :- जगात कोरोना विषाणू चा संसर्ग वाढत असताना शासन,प्रशासन व आरोग्य विभाग मोठ्या शर्तींने लढत आहे. कळवा शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी राज्यातील अनेक लोक विविध रोगाच्या उपचारासाठी येत असतात.रुग्णालय प्रशासन कोरोना संसर्गापासून कमी कर्मचारी व संसाधने असतानाही नागरिकांची सेवा करीत आहेत.कळवा शिवाजी महाराज रुग्णालयातील अतिशय महत्त्वाचा प्रसूती विभाग दि.२३ एप्रिल २०२० गुरुवार रात्री पासून बंद करण्यात आला आहे कारण की एक नर्स मध्ये कर्तव्य पार पाडत असताना,सेवा देत असतांना कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने सदर प्रसूती विभाग बंद करण्यात आला व त्यांचा संपर्कात आलेल्या व्यक्ती चे सॅम्पल्स टेस्ट करिता पाठविण्यात आले आहे. कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रसूती करिता रोज मोठ्या संख्येने महिला येत आहेत. रुग्णालयातील प्रसूती विभाग बंद आहे हे मनपा मार्फत अधिकृत रित्या कळव्यातील आले नसल्याने लांबून येणाऱ्या व प्रसूती समय जवळ असणाऱ्या महिलांचे हाल होत आहेत.प्रसूती विभाग बंद आहे व येणाऱ्या महिलांना कोठे पाठवावे ही मार्गदर्शक तत्वे ही रुग्णालयाला माहीत नाहीत.कोपरी व पडवळ नगर येथे पर्याय निर्माण करण्यात येत असला तरी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूती विभाग बंद असल्याचे प्रसार माध्यमातून जनसामान्यांना मनपा ने कळवायला हवे होते असे ठाणेकरांचे म्हणणे आहे.महिला प्रसूती हा अतिशय गंभीर विषय रुग्णालय प्रशासनाच्या मुळे रोजच्या रोज प्रसूती साठी महिलांची गर्दी होत आहे.ठामपा ने या संदर्भात लवकरात लवकर नागरिकांना जाहीर माहिती देऊन प्रसूती साठी येणाऱ्या महिलांचे हाल थांबवावेत अशी मागणी होत आहे.
ठाणे कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूती विभाग बंद. नागरिकांना माहिती नसल्याने प्रसूती करिता लांबून येणाऱ्या महिलांची तारांबळ.