ठाणे मनपा आयुक्त विजय सिंगल यांनी घेतला आपतीव्यवस्थापन कक्षा चा आढावा.
ठाणे :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे महानगरपालिका, ठाणे येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, सदर नियंत्रण कक्षात आरोग्य विभागामार्फत २४व x ७ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियंत्रण कक्षाला *ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी उपआयुक्त संदीप माळवी, उपआयुक्त ओमप्रकाश दिवटे, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर यांचेसह आज दि. ०६.०४.२०२० रोजी दुपारी १३:५५ वाजता अचानक भेट देऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला व अधिकार्यांना सूचना केल्या.
ठाणे मनपा आयुक्त विजय सिंगल यांनी घेतला आपतीव्यवस्थापन कक्षा चा आढावा.