ठाणे :- जागतिक महामारी असणाऱ्या करोना संसर्गापासून जगाला संरक्षण देणाऱ्या आरोग्य व पोलिस सेवा यांचं सर्वत्र कौतुक होत असताना कळवा सफायर रुग्णालयात करोना उपचारासाठी दाखल असणाऱ्या पोलिसांना लाखो ची बिलं भरावी लागत असून रुग्णालय प्रशासन पोलीस महासंचालक कार्यालयाला, कोणालाही जुमानत नसल्याचे चित्र आहे.ठाणे विभागात करोना संसर्गाचा विरोधात पोलीस दिवस/रात्र जीव धोक्यात घालून काम करीत आहेत,त्यामुळं त्यांना ही करोना चा संसर्ग होत आहे.अश्या वेळी शासनाने विविध योजना अंतर्गत उपचार करण्याची व्यवस्था केली असताना मात्र कळवा येथील सफायर रुग्णालयात करोना उपचारासाठी दाखल असणाऱ्या पोलिसां कडून लाखोंची बिलं रुपी रक्कम वसूल करण्यात येत आहे.विशेष म्हणजे मेडिक्लेम असतानाही ती स्वीकारत नसून वास्तविक करोना वर कोणताही उपचार, औषधे, सद्या नाहीत मग ऐवडी बिलं कशी ?त्यामुळे जीवाची बाजी पणाला लावणाऱ्या पोलिसांचं या घटनेने खच्चीकरण होत आहे त्यांच्या नातेवाइकांच म्हणणे आहे.करोना विरोधी लढाईत पोलीस यांचा साठी थाळ्या/ टाळ्या वाजवण्यात येत आहे, सलाम मारण्यात येत आहे पण पोलिसांनी ही लाखोंची बिलं कशी भरणार यांच्या कडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.संपूर्ण देशात करोना संसर्गा मुळे आरोग्य सेवा कार्यरत असताना काही डॉक्टर व त्यांचे रुग्णालय करोना या महामारीच्या मात्र स्वतःच्या फायद्या साठी व्यवसाय करीत असून संपुर्ण आरोग्य सेवेचे नाव खराब करताहेत असे नागरिकांचं म्हणणं आहे.करोना च्या लढाईत शासनाचा पोलीस हा अतिशय महत्त्वाचा शिलेदार आहे तो व पोलिसांना करोना चा वाढता संसर्ग पाहता शासनाने पोलिसांची काळजी घेतली पाहिजे व पोलिसांच्या आरोग्य विषयांवर गंभीरपणे विचार करावा अशी मागणी होत आहे.तस न केल्यास पोलिसांचा मुळे करोना वर विजय तर मिळेल पण गड आला पण सिह गेला असं म्हणायची वेळ शासनावर येऊ नये हीच अपेक्षा.
कोरोना संसर्गाचा मुकाबला करणाऱ्या करोना मुक्त होणाऱ्या पोलिसांना भरावी लागत आहेत लाखो रुपयांची बिलं.