ठाणे ग्रामीणच्या रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर स्वगृही परतल्यावर नागरिकांनी केले उस्फुर्त स्वागत*

 


ठाणे   : रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज येताच, परिसरातील नागरिकांनी आपापल्या घरात राहून, गॅलरित, गच्चीत, खिडकी जवळ येऊन उस्फुर्तपणे  टाळ्यांचा कडकडाट करत कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आलेल्या ठाणे ग्रामीणच्या व्यक्तींचे नागरिकांनी स्वागत केले. 


कोरोनामुळे भीतीच्या सावटाचे वातावरण आजूबाजुला आहे.
कल्याणच्या परिसरात काही दिवसांपूर्वी संशयित म्हणून हॉस्पिटलमध्ये  दाखल केलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यावर सर्व वैदकीय सोपस्कार पूर्ण करून बुधवारी घरी आणण्यात आले, तेव्हा आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी त्याचे टाळ्यांची आतषबाजी करत स्वागत केल्याने सकारात्मक वातावरण या निमित्ताने पाहायला मिळाले. 


सध्या कोरोनाच्या संकटाचे राज्य मुकाबला करत आहे.महामारीच्या संकटाने सगळीकडेच नकारात्मकचे चित्र निर्माण झाले आहे.ज्या व्यक्ती, कुटुंबाना केवळ घरात अलगीकरन केले हे अशा व्यक्तींकडे देखील भीतीच्या भावनेने नागरिक पाहताना दिसत असताना कल्याण मधील अशी उस्फुर्त घडलेली घटना संबंधीत व्यक्ती आणि कुटुंबाला सकारात्मक बळ देणारी, त्याचा आत्मसन्मान वाढवणारी आहे.


ठाणे ग्रामीण हद्दीतील हा व्यक्ती असल्याने पुढील काही काळासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे आणि टीम पूर्णतः संपर्क ठेवून असणार आहे.


ठाणे ग्रामीण मध्ये तीन व्यक्तींपैकी दोन व्यक्तींना निगेटिव्ह अहवाला नंतर  घरी  सोडण्यात आले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image