हॅाटेल प्रिन्स आयसोलेशनसाठी अधिगृहित ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला निर्णय.

 


ठाणे -: ठाणे शहरात कोव्हीड बाधितांची वाढती संख्या लक्षात घेवून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी आज स्टेशन रोड येथील प्रिन्स हॅाटेल हे लक्षणे दिसून येत नसलेल्या कोरोना बाधीत रूग्णांसाठी आयसोलेशन सेंटर म्हणून अधिगृहित करण्याचा निर्णय घेतला आहे.


      महापालिका आयुक्त श्री. सिंघल यांनी साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील तरतुदी तसेच महाराष्ट्र कोव्हीड -19 उपाययोजना नियम 2020 मधील अधिकाराचा वापर करून सदरचे हॅाटेल तेथील सर्व कर्मचाऱ्यांसह अधिगृहित करण्याचा निर्णय घेतला असून पुढील 24 तासात सदर हॅाटेल आयसोलेशन सेंटर म्हणून कोव्हीड बाधित रूग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहे.
      या आदेशामुळे आता या हॅाटेलमध्ये कोव्हीड 19 च्या संदर्भात कार्यरत अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचारी वगळता अन्य व्क्तींना खोल्या तसेच अन्य कोणत्याही प्रकारची सेवा देण्यास प्रतिबंध केला आहे. त्यामुळे सदर हॅाटेल व्यवस्थापन आणि कर्मचारी यांनी कोव्हीड-19 संसर्ग होवू नये यासाठी शासनाने दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.
      हॅाटेल व्यवस्थापनाने या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरूद्ध साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, कोव्हीड-19 उपाययोजना नियम 2020 तसेच भारतीय दंड संहिता (45 ॲाफ 1860) कलम 188 मधील तरतुदींनुसार दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई कण्यात येईल असा ईशाराही महापालिकेच्यावतीने देण्यात आला आहे.



Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image