ठाणे :-शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत लाॕकडाऊन तंतोतंत पाळून कुणीही घराबाहेर पडणार नाही याची दक्षता घेणे बाबत.
कोरोना या विशाणूच्या जागतिक युद्धात आपण सर्वजण सहभागी असून संकटाला सामोरे जात आहोत .महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , आरोग्यमंञी ते स्थानिक पातळीवरील नगरसेवक तसेच प्रशासनाचे वतीने जिल्हाधिकारी,पोलीसअधिकारी, मनपाअधीकारी, आरोग्यअधीकारी व वाहतूक पोलीस यांचेकडून नागरिकांना घरातच राहण्यास वारंवार आवाहन करूनही रस्ते व मार्केटमधील गर्दी कमी होत नाही. सुरक्षित अंतर ठेवण्याच्या आदेशाचे पालन होत नाही .हे सर्व रोग फैलावण्यास मदत करणारे व आपणांसर्वांना धोकादायक आहे .आपल्या सर्वांच्याभल्यासाठी वारंवार बाहेर न पडण्याचे आवाहन करणारे शासन व पोलिस यंत्रणा वैतागून गेली आहे.शासनाने प्रत्येक सोसायटीला सुचीत करून सोसायटी मधील सदस्य विनाकारण बाहेर पडणार नाहीत हे बघण्याची जबाबदारी सोपविलेली आहे .बर्याच सोसायटीने त्याची अंमलबजावणी आधीच केलेली आहे .आपल्या समितीमधे सलग्न असणाऱ्या ५० सोसायट्यांनी संकटात एकत्र येऊन संकटातून मुक्तता झाल्याचा अनुभव आपल्या पाठीशी आहे .तरी आपल्याला पुन्हा विनंती आहे कि आपल्या सोसायटीचे गेट लाॕक लाऊन पूर्णपणे बंद करणे . आतील व्यक्ती बाहेर व बाहेरील व्यक्ती गेटच्या आंत येणार नाही याची खबरदारी घेणे .त्याकरिता आपल्या सोसायटी एका सदस्याची आळीपाळीने सकाळी ५.०० ते १२-०० वाजेपर्यंत दोन किंवा तीन तासांकरिता नेमणूक करणे.त्याचे जवळ एक रजिस्टर ठेऊन जर कुणी खरोखर कामासाठी किंवा महत्त्वाचे ओंषध वगैरे खरेदीसाठी जात असेल तर त्यांची जातांना व येतांनाची वेळेची व सामानाची नोंद करणे .विनाकारण आतबाहेर जाणेसाठी कोणी हुज्जत घालत असल्यास व आपल्याला शंका आल्यास खातरजमा करून पोलीसांकडे तक्रार करावी .कुणी आॕर्डर करून सामान मागविलेले असल्यास गेटवरच बोलावून त्यांच्या ताब्यात देणे .कुणी व्यक्ती आजारी असल्यास किंवा जेष्ट नागरिकांना ञास संभवत असल्यास सर्वच राजकीय पक्षानी उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिकेशी संपर्क करावा.लाॕकडाऊन आपल्यावर लादलेले नसून आपली *कोरोना* पासून सहीसलामत ठेवण्यासाठी शासनाची रामबाण उपाययोजना आहे .आपण घरातल्या राहून त्याचे पालन करून भयमुक्त होऊया ही विनंती केली.
आपले नम्र विजय देसाई (अध्यक्ष) नदीम जमादार(सचीव) सर्जिल चेऊलकर व डाँ.राहूल कुलकर्णी (उपाध्यक्ष) परेश गायकर(कोषाध्यक्ष) सदस्य - जयसिंग चव्हाण , राहूल धनावडे, कुलदीप नारिंग्रेकर , हेमचंद्र जोशी, संदीप परुळेकर, संतोष बिर्जे, मोहम्मद अश्रफी, महेष जाधव , रुपेश कदम, राजेश सकपाळ, रफीक शेख, मारूभाई शेठ, रुपचंद जैन.विलास पाटील.
कळवा रहिवासी समिती जुना मुंबई-पुणे मार्ग कळवा ठाणे