सफायर हॉस्पिटल कळवा हे खाजगी हॉस्पिटल असून कोरोना विरोधी लढाईत आम्ही शासनाच्या सोबत कार्यरत आहोत पण सफायर हॉस्पिटल ची आर्थिक स्थिती ही पूर्वी पासून हलक्या ची असतांना आम्ही करोना विरोधात नागरिकांच्या आरोग्या साठी प्रयत्नशील आहोत.खाजगी हॉस्पिटल असल्याने व आर्थिक स्थिती हलक्या असताना ही आम्ही स्वखर्चाने करोना संसर्गा बाधित रुग्णांना चांगली सेवा देत आहोत.शासकीय मार्गदर्शक तत्वे नुसार आम्हाला इतर रुग्ण उपचार परवानगी नाही.त्यामुळे दैनंदिन लाखोंचा खर्च व उत्पन्न शुन्य अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.आम्ही पोलिसांच्या उपचारासाठी शासकीय योजनेत आहोत पण त्यासंदर्भात आमच्या सोबत कोणताही पत्रव्यवहार झाला नसून विविध मेडिक्लेम कंपन्या सहकार्य करीत नाहीत त्यामुळे हॉस्पिटल चालवायचे कसे.आर्थिक मदत कोण करणार?दिवस/रात्र आम्ही पोलीस व इतर बाधित करोना रूंगाची सेवा प्रामाणिक पणे करत आहोत पण आम्ही बिलं घेतली नाही तर पुढील करोना रुग्ण करीता सेवा व संबंधित साधने उपलब्ध कशी करणार? त्याच पैश्यातून नवीन रुग्णांना सेवा / उपचार देऊ शकतो.रुग्णांकडून बिलं घेतली नाही तर हॉस्पिटल बंद करावे लागेल.शेकडो लोक बेरोजगार होतील.ठाणे मनपा ने संपूर्ण हॉस्पिटल आपल्या आकतरीत घेऊन चालवावे आम्ही रुग्णांना प्रामाणिक व जबाबदारी सेवा देण्यास बांधील असू.कोरोना विरोधी लढाईत आम्ही प्रामाणिक सेवा देत असतांना आर्थिक बिकट परिस्थिती मुळे समाज्याच्या समोर आम्ही पोलिस/ सर्वसामान्य लोकांचे शत्रू ,असे चित्र निर्माण होऊ नये ही विनंती.शासनाने व संबंधित विभागाने योग्य व तांत्रिक बाबी ची पूर्तता करून करोना विरोधी लढाईत आम्हाला सहकार्य करावे. डॉ.संजीव वॉळन्ज :-प्रमुख सफायर हॉस्पिटल कळवा ठाणे
कळवा टाइम्स च्या बातमी चा इम्पॅक्ट.सफायर हॉस्पिटल कळवा ठाणे यांनी मांडली आपली बाजू. ठामपा डॅशिंग आयुक्त विजय सिंघल यांनी घेतली दखल.