विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी शाळेतून शिल्लक पोषण आहार वाटप.

ठाणे - : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी  प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा बंद ठेवण्यात  आल्या आहेत. मात्र या काळात शाळेतील विद्यार्थी पोषण आहारा पासून वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार ( मध्यान्ह भोजन) योजना सुरू ठेवण्यात आली आहे. 


मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षक यांच्या साहाय्याने शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून, सोशल डिस्टन ठेवून विद्यार्थ्यांच्या पालकांना  शिल्लक असणारा आहार नियोजनपूर्वक वाटप  करण्यात येत असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी संगिता भागवत यांनी दिली. 


जिल्हा परिषदेच्या पाच तालुक्यात १३३१ प्राथमिक शाळा आहेत. या शाळा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद आहेत. असे जरी असले तरी विद्यार्थ्यांच्या पोषणाकरीता सुरू असलेली मध्यान्ह भोजन योजना अर्थात पोषण आहार योजना सुरू आहे. ज्या शाळांमध्ये शिल्लक आहार आहे, अशा शाळा विद्यार्थ्यांच्या पालकांना तांदूळ, डाळ, कडधान्य देत आहेत.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image