कोव्हीड 19 ची चाचणीसाठी विलगीकरण कक्षात राहण्याबाबतचे हमीपत्र आवश्यक. कोव्हीड 19 चा संसर्ग रोखण्यासाठी ठामपा आयुक्त विजय सिंघल यांचा महत्वाचा निर्णय.

ठाणे :- कोव्हीड 19 या साथ रोगाचा प्रसार रोखण्यासाठी कोव्हीड 19 ची चाचणी करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या चाचणीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत विलगीकरण कक्षात राहण्याबाबतचे हमीपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे. संबंधित व्यक्ती कोरोना बाधीत निघाल्यास त्या व्यक्तीपासून नॅान कोव्हीड व्यक्तींस कोव्हीड 19 चा संसर्ग होवू नये म्हणून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी हा निर्णय घेतला आहे.
      ठाणे महापालिका क्षेत्रात आयसीएमआरने प्राधिकृत केलेल्या खासगी चाचणी केंद्रांच्या माध्यमातून कोव्हीड-19 ची चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रावर कोव्हीड 19 ची तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त होण्यासाठी एक किंवा दोन दिवसांचा कालावधी अपेक्षित असतो. जर त्या व्यक्तीचा कोव्हीड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आला तर या कालावधीत त्याच्या पासून अनेक लोकांना कोव्हीडचा संसर्ग होवू शकतो.
      सदरची बाब लक्षात घेवून एखाद्या व्यक्तीने कोव्हीड 19 साठी तपासणी केल्यानंतर त्याचा चाचणी अहवाल प्राप्त होईपर्यंत त्या व्यक्तीला विलगीकरण कक्षात राहणे आवश्यक राहणार आहे. आणि तशा प्रकारचे हमीपत्र त्याने चाचणीच्यावेळी देणे बंधनकारक राहणार आहे. कोव्हीडची बाधा इतरांना होवू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून
सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image