ठाणे :- खेड्यात अंत्यत गरीब परिवारात जन्माला आलेले अर्जुन भिवा भोईर या तरुणाने आपल्या असामान्य कर्तृत्वा ने ठाणे शहरात आपला कार्याचा ठसा उमटवला. भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जबरदस्त प्रभाव अण्णासाहेब यांच्यावर होता.अतिशय कष्टाने शासकीय अधिकारी व सनदि आधिकरी पदावर कार्यरत असताना नागरिक व समाज्याच्या हितासाठी काम केले, गरीब, गरजवंत, यांना मनपूर्वक सहकार्य करत अण्णासाहेब हे अतिशय दिलदार असं व्यक्ती महत्त्व.शिक्षण शिकलं पाहिजे असं ते नेहमी सांगत. अण्णासाहेब हे अतिशय हुशार व कर्तव्यदक्ष अधीकारी होते, आपल्या कारकिर्दीत कोणावर अन्याय होणार नाही याची ते सतत काळजी घेत. ठाणे नायब तहसीलदार पदी असताना २६जुलै २००६ चा महा भयंकर पुराने राज्यात व ठाण्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली होती, त्या वेळी अण्णासाहेब यांची कामगिरी उल्लेखनीय होती, ठाण्यातील प्रत्येक पीडित नागरिकांना शासकीय मदत पोहचविण्या साठी त्यांनी अहोरात्र एक केली. त्या ठाणेकर अण्णासाहेब यांच्याकडे आदराने पाहू लागले, अण्णासाहेब रस्तावर दिसले तरी लोक गर्दी करत त्यांच्या पाया पडत.एखाद्या राजकीय पुढाऱ्यांना ही लाजविल अशी त्यांची प्रतिमा अधीकारी असतांना होती. आण्णासाहेब यांचं ठाण्यातील सर्व राजकीय नेते मंडळी शी नातेसंबंध सलोख्याचे होते .अण्णासाहेब यांचा सर्व आदर करीत. सतत जनसामान्यांच्या साठी भोईर अण्णा कार्यरत असत त्यांच्या कामगिरी मुळेच व त्यांच्यावर असणारे लोकांच्या प्रेमा मूळे वर्तकनगर ठाणे मनपाच्या निवडणूकित दिगग्ज राजकीय नेत्या चा पराभव करत विमलताई भोईर बहुमताने निवडणूक जिकल्या. आपल्या पतीचा वसा कायम जपत विमलताई यांनी आपल्या कामाच्या जोरावर वेगळं राजकीय अस्तिव निर्माण केले.अण्णासाहेब हे विविध सामाजिक संस्था / संघटनेच्या माध्यमातून लोक सेवा निवृत्ती नतंर ही करीत होते.पण काही वर्षांपासून त्यांची प्रकृती बिघडत चालली होती, सर्वांचे लाडके अण्णा आपला वेळ घरात आपल्या मुले/नातवंडे यांच्या सोबत घालावीत, घरात असतांना ही ते सर्वसामान्य नागरिकांची चौकशी आस्तेणे करीत,अण्णासाहेब यांच्या निधनानंतर ठाणे,वर्तकनगर येथे शोककळा पसरली आहे.अस असतांनाही अण्णा यांच्या चाहत्यांनि कोरोना पाश्वभूमी वर नियमांचे पालन करीत कोठे ही गर्दी न करता शिस्तबद्ध रित्या त्यांचे अंतिम विधी काल दि.१८ एप्रिल रोजी रात्री दहा वाजता केला.अण्णासाहेब भोईर यांनी शासकीय महसूल विभागात अनेक उच्च पदे भूषविले पण त्यांना कधीही मोठे पणा नव्हता असं नागरिकांचं म्हणन आहे.अण्णासाहेब यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीच मोठे नुकसान झाल्याचे म्हटले जाते.अश्या ह्या धाडसी आंबेडकरी नेत्यास मानाचा सलाम💐🙏
आंबेडकरी चळवळीतील नेते आण्णासाहेब भोईर यांच्या निधनाने ठाण्यात शोककळा.