प्रशांत तेरडे यांनी गरूजूना स्वतःच्या घासातून दिला घास ठाणे :- लोकमान्य नगर पाडा नंबर ३ येथील प्रशांत तेरडे यांनी सामाजिक बांधीलकी जपत आपल्या मेहनतीच्या पैश्यातून केले अत्यावश्यक वस्तू चे वाटप विशेष म्हणजे त्यांची पत्नी महिला बचत गटाच्या अध्यक्ष्या प्रीती तरडे त्याच्या सोबत सहभाग घेत गरूजूना वस्तूचे वाटप केले.कोरोना संसर्गामुळे सर्वत्र लॉक डाऊन मुळे अहोरात्र काम करणाऱ्या शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नर्स, वॉर्ड बॉय, सुरक्षा रक्षक, व इतर गरजवंता स्वतः जाऊन आपुलकीने विचारपूस करीत आपल्या परीने सहकार्य करीत आहेत.प्रशांत तेरडे, प्रीती तेरडे,यांना या कामात सुशांत देबनाथ,महेश शेट्टी, नंद कुमार शहाणे या मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभले.तेरडे यांच्या या कृती मुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे आहेत
प्रशांत तेरडे यांनी गरूजूना स्वतःच्या घासातून दिला घास