ठाणे जि.प.कर्मचारी संदेश म्हस्के आणि हिरामण खाडे यांना राज्य शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्रदान*

 


ठाणे - :  ठाणे जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागात वरिष्ठ सहायक पदावर कार्यरत असणारे संदेश म्हस्के आणि ग्रामविकास अधिकारी हिरामण खाडे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा गुणवंत कर्मचारी पुरस्कार आज राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा चर्चगेट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संपन्न झाला.


जिल्हा परिषद स्तरावर उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी यशवंत पंचायत राज अभियाना अंतर्गत पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. श्री. म्हस्के हे २००० साली  कनिष्ठ सहाय्यक पदावर रुजू झाले.  सध्या ते जिल्हा परिषद कृषि सभापती यांचे स्वीय सहायक म्हणून काम करत आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना (रजिस्टर 615 ) ठाणे शाखेचे  जिल्हा सचिव म्हणून काम पाहत आहेत. तर  श्री.खाडे २००४ साली सेवेत रुजू झाले सध्या ते ग्रामपंचायत वाफे येथे  ग्रामविकास अधिकारी पदावर कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने या दोघांचे अभिनंदन करण्यात आले.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image