ठाणे मनपा जेष्ठ नगरसेविका/ विरोधी पक्ष नेत्या प्रमिलाताई केणी यांनी गरजू साठी स्वतः घरी बनविले जेवण.
ठाणे मनपा जेष्ठ नगरसेविका/ विरोधी पक्ष नेत्या आज माणुसकीच्या नात्याने आपलं कर्तव्य पार पडले.संपुर्ण राज्यात सकाळी सात ते रात्री नऊ वाजते पर्यंत संचार बंदी लागू असल्याने आज सर्व पोळीभाजी केंद्र, कॅन्टीन बंद असल्याने जे २४ तास कार्यरत असणारे कर्मचारी तसेच शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण यांचा आहारा चा प्रश निर्माण झाला असता केणी परिवार पुढे सरसावले.मंदार केणी, नगरसेवक मुकुंदशेठ केणी व सर्व कुटुंबातील सदस्यांनी स्वतः मेहनत घेऊन आपल्या घरात सुमारे तीनशे लोकांचे स्वादिष्ट जेवण तयार करून गरजूंना पाठवले. अतिशय श्रीमंत व सुशिक्षित असणारा हा केणी परिवार मात्र सर्व सामन्याशी त्यांची नाळ जोडली आहे. कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी न करता अगदी साधी राहणी असणाऱ्या केणी परिवारा चे कळवा विभागा कौतुक होत आहे. केणी कुटुंबा ने व विरोधी पक्ष नेत्या यांनी राजकारणात असूनही एक वेगळं उदाहरण आहे.
ठाणे मनपा जेष्ठ नगरसेविका/ विरोधी पक्ष नेत्या प्रमिलाताई केणी यांनी गरजू साठी स्वतः घरी बनविले जेवण.