ठाणे :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबधात्मक उपयायोजना म्हणून ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग समितीमधील एकूण 131 निवडणूक बूथ निहाय 33 वॉर्डस तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी वैद्यकिय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कोव्हीड - 19 ची प्राथमिक तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
या सर्व प्रभाग समिती निहाय तपासणी केंद्रात संशयित रुग्णाची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. या केंद्रात ठाणे महापालिकेचे उपलब्ध" वैद्यकिय अधिकारी" यांच्या सोबतच शक्य त्याठिकाणी खाजगी व्यवसायिक वैद्यकिय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
त्यांना या संदर्भातील आवश्यक त्या वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून रुग्णाची प्राथमिक तपासणी येथे करण्यात येणार आहे.
सर्व सहायक आयुक्त यांचे सोबत समन्वय करुन त्या-त्या क्षेत्रातील सर्व हाऊसिंग सोसायटीना भेटी देऊन कोणाली कोव्हीड - 19 ची लक्षणे आहेत काय ? याचा आढावा घेण्यात येणारआहे. काही लक्षणे आढळल्यास शासनाचे निर्देशान्वये संबंधितांस अलगीकरण / अथवा टेस्टिंगसाठी पाठविण्यात येणार आहे.
पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास शासन निर्देशान्वये क्लोज कॉन्टॅक्ट पर्सन शोधणे, 500 मी , क्षेत्रातील सर्व रहिवाशांचे सर्व्ह करणे आदी कामे आरोग्य विभागाचे कर्मचारी , प्रभाग समितीमधील अन्य विभागातील कर्मचारी यांची आवश्यक पथके स्थापन करुन त्यांचेमार्फत सलग 14 दिवस सर्वेक्षण करण्याचे काम वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचेशी समन्वय ठेवून करण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार संशयित व्यक्तीना शोधणे त्यांचा पाठपुरावा करणे, त्यांच्यावर उपचार करून वरील परिस्थितीत संबंधित इमारत व परिसर हायपोक्लोराईटने निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
तसेच प्रत्येक टीमने दिवसभर केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल दररोज सांयकाळी 5.00 वाजेपर्यंत समन्वयक (कोव्हिड - 19 ) तथा उपआयुक्त सचिन गिरी यांचे covidio. imc@thanecity.gov. in या ई - मेल आयडीवर पाठविण्यात येणार आहे.
दरमान्य कोरोना विषाणू रोगाचा प्रसार टाळण्यासाठी ठाणे महापालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेसाठी निवृत्त वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ.आर.टी. केंद्रे यांच्या नियंत्रणाखाली
महापालिका भवन येथे दुस-या मजल्यावर कोरोनासाठी वैद्यकिय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.