ठाणे जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी - जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर.

 


ठाणे :- जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची  विक्री करणारी सर्व दुकाने, पानटपऱ्या इ. पुढील आदेश येईपर्यत बंद ठेवण्यात यावीत असे आदेश  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर  यांनी दिले आहेत. सदर आदेश आज बुधवार दि.18 मार्च 2020  पासुन तात्काळ लागू करण्यात आला आहे.


  देशात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी ठाणे  जिल्ह्यात तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुकणे व धुम्रपान करणे यामुळे कोरोना विषाणू (COVID-१९) चा प्रसार व प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे असे पदार्थ विक्री करणारी दुकाने व पानटपऱ्या इ.वर बंदी घालण्यात आली आहे.


या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था ,असंस्था, संघटना, महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम, २०२० चे नियम ११ नुसार, भारतीय दंड संहिता ( ४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतुदीनुसार, दंडनिय/ कायदेशीर कारवाईस पात्र राहील.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image