ठाणे मनपाची यंत्रणा करोना संसर्ग टाळण्यासाठी २४ तास कार्यरत.४० बेडचे विलगिकरन कक्ष तयार.
ठाणे:- ठाणे मनपा चे सर्व यंत्रणा, विभाग, आधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग, विदूत विभाग,आपत्ती व्यवस्थापन, करोना या संसर्गजन्य विषाणू ची रोखधाम करण्यासाठी रात्र/ दिवस कार्यरत आहेत.त्याचाच परिणाम की मनपा हद्दीत एकही कोरोना व्हायरस बाधित एकही रुग्ण आज पर्यंत सापडला नाही.मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व ठामपा विविध मार्गाने कोरोनो व्हायरस जनजागृती करीत आहेत.कोणत्याही परिस्थिती ला सामोरे जाण्यासाठी ठाणे जिल्हा व मनपा सर्व स्तरावर सज्ज आहे.राज्यात करोना परिस्थितीत नियंत्रण ठेवण्यासाठी ठाणे मनपा ने कासार वडवली घोडबंदर रोड, शेंडोबा मंदिरा मागे,ट्राफिक पार्क, कासारवडवली (प)ठाणे येथील BSUP च्या तीन इमारतीचे ४० कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.सदर विलगिकरन कक्षात Wifi सेवा,tv, पंखे, यांची सुविधा उपलब्ध आहेत. विशेष ज्या प्रवाशांना घरी राहण्यास सांगण्यात आले अश्या संशयितांनी नियम पाळले नाही तर त्यांना विलगीकरन कक्षात ठेवण्याची शक्यता आहे.या विलगिकरन कक्षात डॉक्टर, नर्स, व इतर वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली आहे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने ही बंदोबस्त असणार आहे.कोरोना व्हायरस पासून ठाण्याला दूर ठेवण्यासाठी ठाणे जिल्हा व मनपा प्रशासन अहोरात्र कार्यरत असून त्याच्या प्रयत्नांना ठाणेकरांनी ही सहकार्याची भूमिका घेतल्या चे चित्र आहे व ठाणेकर गर्दी टाळत असून ठाणे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त, आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरी मुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
war against virus.
ठाणे मनपाची यंत्रणा करोना संसर्ग टाळण्यासाठी २४ तास कार्यरत.४० बेड चे विलगिकरन कक्ष तयार.