ठामपा विरोधी पक्ष नेत्या प्रमिला मुकूंद केणी यांनी ठाणे मनपा हद्दीतील रेल्वे स्थानकं, एस.टी.डेपो, बस आगार येथे आरोग्य तपासणी केंद्र उभारण्याबाबत केली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.....

 



ठामपा विरोधी पक्ष नेत्या प्रमिला मुकूंद केणी यांनी ठाणे मनपा हद्दीतील रेल्वे स्थानकं, एस.टी.डेपो, बस आगार येथे आरोग्य तपासणी केंद्र उभारण्याबाबत केली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.


ठाणे :- नरेंद्र कसबे.


ठाणे : प्रतिनिधी, जगभरात सगळीकडे कोरोना विषाणूंच्या संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असताना महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने योग्य पाऊले उचलली जात आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांनी दिलेल्या निर्देशानुसार आय.टी. क्षेत्रातील कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम अर्थात घरी बसून काम करण्याची मुभा दिलेली असल्याने मुंबई, पुणे तसेच नागपूर या शहरांतून कर्मचारी मोठ्या प्रमाणात ठाण्यात ये - जा करताना पहावयास मिळत आहेत. देशातील विमानतळांच्या धर्तीवर ठाणे मनपा हद्दीतील रेल्वे स्थानकं, एस.टी.वर्कशॉप, बस डेपो अशा ठिकाणी आरोग्य तपासणी केंद्र उभारल्यास कोरोना विषाणूच्या संसर्गापासून ठाणेकर नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहू शकते असे मत ठाणे मनपा विरोधी पक्ष नेत्या सौ.प्रमिला मुकूंद केणी व्यक्त केले असून याबाबत गृहनिर्माण मंत्री ना.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन देखील दिले आहे.


याप्रसंगी प्रमिला केणी यांनी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आवश्यकता नसल्यास तमाम ठाणेकर नागरिकांनी आपल्या घरातून बाहेर पडू नये असे आवाहन केले.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image