ST महामंडळाच्या अजब न्याय.वसई-विरार एसटीमध्ये ठाणे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोजावे लागताहेत पैसे.

ठाणे :-  संपुर्ण भारतात कोरोना विषाणुने थैमान घातला आहे.विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावत असतानाच मात्र या कर्मचाऱ्यांना नेआण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या गाड्यामधून पैसे मोजावे लागत आहेत.ठाणे खोपट येथील ATI भोईर या अधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या ठामपा कर्मचारी यांच्याशी अरेरावी पणाची वागणुक देत वाचकांस  तिकीट देण्यास सांगितले असे ठाणे मनपा कर्मचाऱ्यांच म्हणणे आहे.एरव्ही मुंबई व उपनगरांतील सर्वच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास असल्यामुळे ठामपा कर्मचाऱ्यांना मात्र अन्याय सहन करावा लागत आहे.


   कोरोना विषाणुचा प्रसार ठाणे महानगरपालिका हद्दीतील जनतेला होऊ नये म्हणून पालिका प्रशासन विशेष काळजी घेण्यात येत आहे.ठाणे जिल्ह्यातील खाजगी गाड्या,लोकल सेवा बंद असल्यामुळे बदलापूर,शहापूर,कल्याण येथील अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळानेच प्रवास करावा लागत आहे. लोकलच्या प्रवासापेक्षा या अंतरांचा प्रवासदर हा मोठाच आहे.कोरोनाशी दोन हात करताना पालिकेतील कर्मचाऱ्यांना मात्र भुर्दंड पडत आहे.


  दरम्यान मुंबई महानगर पालिकेतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाचे कर्मचारी मोफत प्रवास करण्यास कोणतीच हरकत घेत नाहीत.मात्र ठाणे महानगरपालिकेचा एखादा वैद्यकीय कर्मचारी,अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांची विचारपूस केली असता त्यांना प्रवासभाडे भरावे लागत आहे.त्यामुळे एसटी महामंडळाने ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना या मोफत सेवेतून वगळले की काय असा प्रश्न पडला आहे? त्यामुळे किमान या महामारीच्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास मिळावा अशी मागणी जनतेतून होत आहे.


 


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image