कोरोनाच्या माहितीसाठी भारत सरकारने सुरू केला 'व्हॉटसअँप हेल्पडेस्क'

 


कोरोनाच्या माहितीसाठी भारत सरकारने सुरू केला 'व्हॉटसअँप हेल्पडेस्क'


नवी दिल्ली – भारत सरकारच्या आरोग्य विभागाकडून व्हाट्सअँप हेल्पडेस्क सुरु करण्यात आला आहे. +91 9013151515 या नंबर वरून ‘चाटबोट’ च्या माध्यमातून कोरोनाविषयी हवी ती विश्वासार्ह माहिती मिळवता येणार आहे.
या शिवाय +91-11-23978046 आणि 1075 (टोल फ्री) नंबरवरून तसेच ncov2019@gov.in या ई-मेल द्वारे भारतीय नागरिकांचे कोरोनाविषयीच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे.


यासाठी व्हाट्सअँप हेल्पडेस्कचा +91 9013151515 हा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे. त्यांनतर मोबाईलमधील व्हाट्सअँप अँप्लिकेशनमध्ये जाऊन या नंबरला फक्त ‘HI’ मेसेज करायचा आहे. हा मेसेज केल्यानंतर लगेच तुम्हाला रिप्लाय मिळतो, ज्यामध्ये A ते F पर्यंत वेगवेगळे पर्याय दिलेले असतात. समजा तुम्ही A टाईप करून पाठवले तर त्यासंबंधित माहिती तुम्हाला मिळते.


उदाहरणादाखल, A या पर्यायावर कोरोना म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती, असा प्रश्न आहे . तुम्ही A टाईप केले तर या प्रश्नाचे उत्तर व त्याच्याशी निगडित वीडिओची यु-टूब लिंक तुम्हाला व्हाट्सअँपवर मिळते. जर तुम्हाला कोरोनाबद्दल काही शंका किंवा समस्या असतील तर या नंबरवर संपर्क साधून माहिती मिळवू शकता.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image