नाव:अब्दुल अजीम (IAS अधिकारी) राज्य -तेलंगाना जिल्हा-भुपलपल्ली ठिकाण-जिल्हा मुख्यालय.

 


कलेक्टरची गाडी कार्यालयाकडे येते,कलेक्टर साहेब गाडीतून उतरून ऑफिसमध्ये जाण्यासाठी पायऱ्या चढतात...त्याच पायऱ्यावर एक म्हातारी हात जोडून बसलेली दिसते...


#कलेक्टर साहेब थांबतात, शिपायाला विचारतात...त्याच्याकडे काही माहिती नसते.


#कलेक्टर स्वतःहा त्या म्हातारी शेजारी पायऱ्यावर बसतात.


#आज्जीला विचारतात काय अडचण आहे,आज्जी सांगते दोन वर्षांपासूनची पेंशन भेटली नाही.साहेब कागदपत्र मागतात,आज्जी सगळे कागदपत्र साहेबांच्या हातात ठेवती.
आणि सोबत तिला झालेला सगळा त्रास विनंती वजा तक्रार स्वरूपात सांगती.
बाबू लोकांनी किती त्रास दिला किती चकरा मारल्या याचा सगळा लेखाजोखाच मांडती.


#कलेक्टर साहेब आज्जीचे सगळे कागपत्र व्यवस्थित चेक करतात आणि आज्जीला सांगतात इथेच थांबा तुमचं काम आजच होईल.


#कलेक्टर साहेब सबंधित अधिकाऱ्याला तात्काळ हजर राहण्याचे आदेश देतात.


तो अधिकारी #कलेक्टर साहेबांच्या जवळ त्या पायऱ्यांवर उपस्थित राहतो.त्याच पायऱ्यांवर त्या म्हातारीच्या दोन वर्षांपासूनचा रखडत असलेला पेंशनचा प्रश्न सुटतो.


शेवटी कुठल्या पदावर कोण व्यक्ती आहे यापेक्षा त्या पदावरील ती व्यक्ती किती संवेदनशील आहे हे महत्वाचं आहे.


लोकांच्या दुःखाची जाण असणाऱ्या,माणुसकीची मूल्य जपणार्या #कलेक्टर अब्दुल अजीम साहेबांना सलाम.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image