ठाणे ;- जागतिक पातळीवर करोना या विषाणू चा संसर्गामुळे संपूर्ण जग लॉकडाऊन असताना सेकंदाची अतिमहत्त्वाच्या बातम्या अपडेट्स, शासकीय सूचना, आदेश, नियम, निरबन्ध, कायदे,जनतेला पुढील मार्गदर्शन या संदर्भात सेकंदातच जगाला पोहचण्यासाठी कार्यरत असणाऱ्या वेब मीडिया ची कामगिरी कौतुकास्पद आहे.राष्ट्रीय व स्थानिक वृत्तपत्र यांची छपाई बंद असल्याने ठराविक राष्ट्रीय वृत्तवाहिन्या सोडल्या तर या आपत्कालीन वेळी माणूस माणसाला भेटू शकत नसताना वेब मीडिया मुळे सर्व व बारीकसारीक घडामोडी ची तंतोतंत माहिती वेब मीडिया मुळे नागरिकांना मिळत आहे.यु ट्यूब चायनल, फेसबुक, ट्विटर, व्हाट्सएपच्या या माध्यमातून नागरिकांना घरी बसून सर्व माहिती मिळत आहे काही अपवादात्मक व अत्तेताई मंडळी सोडली तर वेब मीडियाने या आपत्कालीन आपली भूमिका चोख व जबाबदारी ने पार पाडली आहे.वेब मीडिया ला नेहमीच दुय्यम स्थान/ वागणूक मिळत आली आहे मग ती शासकीय असो वा स्थानिक पातळीवर असो पण आज वेब मीडिया च महत्त्व लक्षात घेता शासनाने लाखो वेब मीडियात अहोरात्र कार्यरत असणाऱ्या व सेकंदाची अपडेट सर्वसामान्य जनतेला पोहचवणार्या पत्रकारास सन्मान व कायदेशीर धोरनात्मक अधिकार दिला पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.जग जरी लोकडाऊन झाले तरी वेब मीडिया बंद होऊ शकत नाही हे लक्षात घेतले पाहिजे
शासकीय धोरण नसणाऱ्या वेब मीडियाचेच संकटसमयी आपडेट्स.