ब्रिटनच्या राजघराण्यावर 'कोरोना'चा हल्ला ; प्रिन्स चार्ल्स कोरोना पॉझिटिव्ह

 


ब्रिटनच्या राजघराण्यावर 'कोरोना'चा हल्ला ; प्रिन्स चार्ल्स कोरोना पॉझिटिव्ह


ब्रिटन - कोरोना विषाणूपुढे सर्वजण समान आहेत. स्वतःची योग्य काळजी घेणार नाही त्याला कोरोनाची बाधा होत आहे. सर्वसामान्यांना कोरोना होतोय तसाच तो ब्रिटनच्या राजघराण्यापर्यंत जाऊन पोहचला आहे. ७१ वर्षीय प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त असून त्याला अधिकृत दुजोराही मिळाला आहे. त्यांची प्रकृतीही स्थिर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


चार्ल्स यांची करोना चाचणी स्कॉटलँड येथे करण्यात आली आहे. प्रिन्स चार्ल्स यांना करोनाची लागण झाल्याचे कळताच नागरिकांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, चार्ल्स यांच्या पत्नी कॅमिला यांचे रिपोर्ट मात्र निगेटीव्ह आले आहेत. काही दिवसांपूर्वी चार्ल्स मोनॅकोचे प्रिन्स अल्बर्ट यांना भेटले होते. त्यानंतरच त्यांची तब्येत बिघडली. तेव्हापासून त्यांनी घराबाहेर पडणेही बंद केले होते. ते घरातूनच काम करत होते.


ब्रिटनमध्ये करोनामुळे सुमारे ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८००० हून अधिक जणांना याची लागण झाली आहे.


प्रिन्स चार्ल्स यांना कोणत्या कारणास्तव कोरोनाची बाधा झाली, हे अद्यापि स्पष्ट झालेले नाही. प्रिन्स चार्ल्स यांचे राजवाड्यातच विलगीकरण करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image