राज्यातील रुग्णालयात विलगीकरण कक्ष

 


राज्यातील रुग्णालयात विलगीकरण कक्ष


विलगीकरण  जिल्हा रुग्णालये शासकीय वैद्यकीय महाविद्यालये मोठ्या शहरातील खासगी रुग्णालये विलगणीकरण कक्ष सुरु केले आहेत.


अधिसूचना जारी


चीन, दक्षिण कोरीया, इटली, फ्रान्स, जर्मनी व इराणमधून आलेल्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. पण आपल्याकडे काही प्रवासी दुबई व अमेरिकेतून आले आहेत. म्हणून राज्य सरकारकडून केंद्राला ही बाब निदर्शनास आणून देण्यात येईल. केंद्राने दिलेल्या यादीच्या व्यतिरिक्त इतर दोन देशातून आलेल्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. त्याची माहितीही केंद्र सरकारला दिली जाईल. मुंबई पुणे, नागपूरमध्ये विलगीकरण कक्षाची सोय केली आहे. जनतेच्या आरोग्याच्या राज्य सरकार पावले उचलत आहेत. सुदैवाने सतरा रुग्णांमध्ये सुदैवाने गंभीर स्वरुपाची लक्षणे आढळलेली नाहीत. पण वेळेत सावध झालो आणि दक्षता घेतली तर पुढील धोक टाळू शकतो. म्हणूनच एपिडमीक डिसीज १८९७च्या कलम १९ दोन अंतर्गत राज्य सरकार अधिसूचना काढत आहे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.


हस्तांदोलनाऐवजी नमस्कार


गर्दी टाळणे हात मिळवणे हात धुणे हस्तांदोलनाऐवजी दुरून नमस्कार करणे असे छोटो पण परिणामकारक उपाय आहेतच पण या शिवाय इतर बाबींची इतरांनी तात्काळ अंमलबजावणी करावी. यासाठी सरकारने काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत.


चित्रपटगृहे नाट्यगृहे व व्यायामशाळा बंद


. मुंबई , नवी मुंबई, ठाणे पुणे पिंपरी चिंचवड व नागपूर या शहरातील जीम, व्यायामशाळा, चित्रपटगृहे नाट्यगृह, जलतरण तलाव आज मध्यरात्रीपासून पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरत्या  बंद ठेवण्यात येतील असे त्यांनी सांगितले.


अनावश्यक गर्दी टाळा


रेल्वे व बस सेवा या अत्यावश्यक सेवेमध्ये येतात. त्यामुळे या सेवा बंद करता येत नाहीत.  पण अनावश्यक प्रवास व गर्दी टाळावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला यावेळी केले. नाहक घबराट नको. म्हणून ज्या ठिकाणी गरज वाटते त्याच गोष्टी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


 


माँल- रेस्टाँरंट टाळा


माँल, रेस्टाँरंट व हाँटेल आपण बंद करीत नाहीत पण अशा ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


कार्यक्रमाच्या परवानग्या रद्द


 विविध कार्यक्रमाच्या आयोजकांनाही कार्यक्रम आयोजित न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. धार्मिक, सांस्कृतिक व व्यावसायिक कार्यक्रम व राजकीय कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा घेण्यात येऊ नयेत. अशा कार्यक्रमांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत परवानगी दिली जाणार नाही. यापूर्वी अशा कार्यक्रमांना परवानगी दिली असेल तर रद्द करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.


वर्क फ्राँम होमची परवानगी


ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी सर्व कर्मचा-यांना वर्कफ्राँम होमची परवानगी दयावी असे आवाहन त्यांनी खासगी कंपन्या व कंपनीच्या मालकांना यावेळी केले.


पुणे, पिपंरी चिंचवडमधील शाळा बंद


शाळा व महाविद्यालात दहावी  व बारावीच्या परिक्षा सुरु राहतील. पण खास करून पुणे व पिंपरी चिंचवडमधील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येतील.


मुंबईतील शाळा बंद नाहीत


मुंबईत आपण शाळा बंद केलेल्या नाहीत. कारण उगाचच भीतीचे वातावरण तयार व्हायला नको.  खासगी शाळा स्वतःहून बंद केल्या आहेत. पण आवश्यक्तेपेक्षा जास्त भीती लोकांमध्ये निर्माण नको याची खबरदारी आपणही घेतली पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले.


राज्याच्या हितासाठी निर्णय


राज्याच्या हितासाठी ही पावले उचलण्यात येत आहेत. सर्वजण सहकार्य कराल असे आवाहन त्यांनी यावेळी राज्यातील जनतेला केले.


परिक्षांचा निर्णय आरोग्य विभागाशी चर्चा करून


शाळांच्या परिक्षा लवकर घेण्याची सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केली. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शाळांच्या परिक्षा लवकर घेण्यापेक्षा थोड्या उशीराने घेणे योग्य राहिल कारण पुढील पंधऱा दिवस काळजी घेण्यासारखे आहेत. आता लक्षणे दिसायला लागली आहेत पहिला रुग्ण सहा-सात मार्चला रुग्णालयात दाखल केला आहे. सुदैवाने सर्व रुग्णांची प्रकृती स्थीर आहे. म्हणून अधिक गंभीरतेची वाट  न बघता वेळीच टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे शाळांसोबत चर्चा करू व आरोग्य विभागाशी चर्चा करून आढावा घेऊन मग परिक्षांचे काय करायचे  त्याचा निर्णय घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image