मास्क, हँड ग्लोज कचरा पेटीमध्ये टाकू नका कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांचे आवाहन

 


मास्क, हँड ग्लोज कचरा पेटीमध्ये टाकू नका
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांचे आवाहन


ठाणे - :कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी वापरण्यात येणारे मास्क वापरल्यानंतर कच-याच्या पेटीत न टाकता त्यासाठी वेगळी पिशवी वापरण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.


    दरम्यान घन कचरा व्यवस्थापनामध्ये काम करणा-या सफाई कर्मचा-यांनीही याची दक्षता घेवून असा हे मास्क स्वतंत्रपणे संकलित केले जातात किंवा नाही याची खातरजमा करण्याच्या सूचनाही त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिल्या आहेत.


 कोरोना विषाणूपासून आपला बचाव करण्यासाठी बहुतांशी नागरिक मास्कचा तसेच हँड ग्लोजचा वापर करीत आहेत. परंतू वापर केल्यानंतर ते मास्क किंवा ग्लोज आपल्या घरातील कच-याच्या पेटीत न टाकता त्याची स्वतंत्रपणे व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून कोरोनाच्या विषाणूचा प्रसार होणार नाही असे आवाहन श्री. सिंघल यांनी ठाणेकर नागरिकांना केले आहे.


 याबाबत महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये काम करणा-या आणि कच-याचे संकलन करणा-या कर्मचा-यांनीही याची खातरजमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image