नोंदणीकृत रूग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक, औषध दुकाने बंद राहिल्यास होणार कारवाई:ठामपा महापालिका आयुक्त विजय सिंघल.

 


नोंदणीकृत रूग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक, औषध दुकाने बंद राहिल्यास होणार कारवाई:ठामपा महापालिका आयुक्त विजय सिंघल.


ठाणे :- ठाणे शहरामध्ये कोरोनाचा प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने तसेच सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य विषयक सेवा देणे अतिशय महत्वाचे असून जी नोंदणीकृत रूग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक, औषध दुकाने तसेच संबंधित आरोग्य विषयक खाजगी आस्थापना बंद राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत.
      साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १९८७ ची राज्यात अंमलबजावणी सुरू असून या अधिनियमान्वये कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महापालिका आयुक्त हे सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
           या अधिनियमांतील तरतुदींद्वारे प्रदान केलेल्या अध्काराचा वापर करून श्री. सिंघल यांनी ठाणे शहरातील नोंदणीकृत रूग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक, औषध दुकाने तसेच संबंधित आरोग्य विषयक खाजगी आस्थापना बंद राहिल्याचे निदर्शनास आल्यास त्या आस्थापनांचे परवाने रद्द करण्याबरोबरच त्यांचेवर भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image