मुंबईत बनावट सॅनिटाइझर्स जप्त: संस्कार आयुर्वेद नावाच्या कंपनीवर छापा

मुंबईत बनावट सॅनिटाइझर्स जप्त: संस्कार आयुर्वेद नावाच्या कंपनीवर छापा
मुंबई - प्रतिनिधी.
कोरोनाच्या भीतीचा फायदा उचलण्यासाठी बनावट उद्योगधंद्यांनी कंबर कसली आहे. अनेक कंपन्यांनी वेगवेगळ्या नावाने सॅनिटाइझरची निर्मिती सुरु केली आहे.  फक्त पाणी आणि केमिकल मिसळून बनावट सॅनिटायझर बनविण्यात येत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. मुंबईच्या अन्न व औषध विभागाने (एफडीए) वाकोला येथील संस्कार आयुर्वेद या फॅक्टरीत छापेमारी करत मोठ्या प्रमाणात बनावट सॅनिटाइझर जप्त केले आहे. संस्कार आयुर्वेद नावाची सॅनिटाइझर तयार करणारी फॅक्टरी 8 दिवसांपासून सुरू केल्याचे तपासात उघडकीस आले. याप्रकरणी चार लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे.
 एफडीएचे निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले की, "सदरील कंपनी विनापरवागनी सॅनिटाइझर तयार करत होती. या कंपनीची स्थापना 8 दिवसांपूर्वी बनावट मार्गाने केली गेली होती. कंपनीच्या फॅक्टरीत मिळालेल्या सॅनिटाइझर बॉटल्सवर लायसेन्स नंबर किंवा बॅच नंबर नव्हते." दरम्यान, ही कंपनी 'मेड इन वकोला' या नावाने बनावट सॅनिटायझर्सची विक्री करीत असल्याचे एफडीएच्या तपासणीत असे दिसून आले आहे. हे बनावट सॅनिटाइझर बाजारात 105 ते 190 रुपयांपर्यंत विकले जात होते. यामध्ये पाणी आणि निकृष्ट दर्जाचा कच्चा माल वापरण्यात येत होता. चिंतेची बाब म्हणजे, कोणत्याही तपासणीशिवाय वैद्यकीय स्टोअर्समध्ये बिनधास्तपणे ग्राहकांना हे बनावट सेनेटिझर्स विकले जात आहे.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image