अत्यावश्यक सेवेसाठी असणाऱ्या वाहनांवर स्टिकर आवश्यक - जिल्हाधिकारी
ठाणे -: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाववर नियंत्रण मिळवण्यासाठी संचारबंदी लागु करण्यात आलेली आहे. फक्त अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. यामध्ये येणा-या आस्थापनांनी त्यांच्या वाहनांवर तसेच कर्मचाऱ्यांसाठी तैनात ठेवलेल्या वाहनांवर स्टिकर लावावे असे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
अत्यावश्यक सेवा वगळता 31मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आता कठोर पावलं उचलली जात आहेत. अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणा-या आस्थापनांच्या वाहनांवर तसेच कर्मचारी वाहतुक करणाऱ्या वाहनांवर स्टिकर लावणे आवश्यक आहे. हे स्टिकर दर्शनी भागात लावावे ज्यायोगे कायदा व सुव्यवस्था यंत्रणेला ते स्पष्टपणे दिसेल. तरी सर्व अत्यावश्यक सेवेतील आस्थांपनांनी तातडीने स्टिकर लावण्याची कार्यवाही करावी असे आदेश श्री नार्वेकर यांनी दिले आहेत.