माईसाहेब गुजरातमधील एक हॉस्पिटलमधून चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून करत असलेले काम सोडून , इकडे मुंबईत डॉ मालवणकर यांचेकडे त्यांच्या डिस्पेन्सरीत त्यांच्या सहाय्यक म्हणून काम करत होत्या.
त्यामुळे बाबासाहेब आणि त्यांची ओळख घट्ट झाली.....☘
🌹बाबासाहेब केंद्रात मंत्री होते. बाबासाहेबांना देखभालीसाठी नर्सची गरज होती . बाबासाहेबांनी पत्राद्वारे माईसाहेबांना लग्नाची मागणी घातली.....👍🌹
🌹माईसाहेबांचा जन्म २७ जानेवारी १९०९ चा आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ चा या दोघांमध्ये १८ वर्षांचे अंतर होते.....☘
🌹माईसाहेबांचे वडील कृष्णराव कबीर यांना पाच मुली आणि तीन मुले होती त्यापैकी सहा भावंडांचा आंतरजातीय विवाह झाला होता. म्हणजेच हे घराणे सुधारणावादी विचारांचे होते......☘
🌹सविता आंबेडकर यांचा जन्म २७ जानेवारी इ.स. १९०९ रोजी पुण्यात झाला. त्यांचे माहेरचे नाव शारदा कबीर होते. त्यांचे घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील दोरला गावचे होते. त्यांचे वडील कृष्णराव कबीर इंडियन मेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रार होते. कृष्णरावांना पाच मुली व तीन मुलगे होती. या एकूण आठ मुलांपैकी ६ भावंडांचा विवाह आंतरजातीय झाला, इतके ते त्या काळातही पुरोगामी विचाराचे होते. याबद्दल माईसाहेबांना मोठा अभिमान वाटे.....☘
🌹शारदा ह्या विद्यार्थिदशेत अत्यंत हुशार होत्या. त्यांनी आपले शालेय शिक्षण पुण्यात घेतले व नंतर मुंबईच्या ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरीसाठीची एम.बी.बी.एस ही पदवी मिळवली. त्या महाविद्यालयाच्या वसतिगृहात असतांना अभ्यास नि आपण एवढीच त्यांची दिनचर्या होती....☘
🌹 या वसतिगृहासमोरच असलेल्या ‘मणीभवन’ येथे १४ ऑगस्ट १९३१ रोजी बाबासाहेब आंबेडकरांची महात्मा गांधीशी मोठी खडाजंगी झाली होती. पण त्या भेटीसंबंधी त्यांना वसतिगृहात असूनही काहीच माहिती नव्हती. त्यांचे एम.डी.च्या परीक्षेचे पेपर्स अत्युत्तम गेले. पण ऐन प्रॅक्टिकल परीक्षेच्या वेळी त्यांना टायफाॅईड, डिहायड्रेशन, बॉईल्स असे आजार झाले व त्यांचे एम.डी. होणे राहून गेले. याच काळाच त्यांनी वैचारिक पुस्तकांचे वाचन केले. शारदा कबीर यांनी गुजरातमध्ये काही काळ चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून एका हॉस्पिटलमध्ये काम केले, नंतर त्या मुंबईत आल्या आणि निष्णात फिजिओथेरपिस्ट, नामवंत सल्लागार व तज्ज्ञ डॉक्टर अशा मालवणकरांबरोबर काम करू लागल्या. तेथे इ.स. १९४७ साली त्यांची आणि रक्तदाबाच्या आणि मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली. त्यापूर्वी डॉ. राव यांच्या घरी त्यांची भेट झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिली पत्नी रमाबाई (रमाई )आंबेडकर यांचे २७ मे १९३५ रोजी निधन झाले....😥 त्यानंतर बाबासाहेबांनी प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टर असलेल्या शारदा कबीर यांचेकडून वैद्यकीय सेवा घेतली......☘
🌹मुंबईच्या विलेपार्लेमध्ये राहणारे डॉ. एस. राव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घनिष्ठ संबंध होते. तसेच डॉ. शारदा कबीर यादेखील डॉ. राव यांच्या घरी येत जात असत. कारण त्यांच्या मुली आणि शारदा मैत्रिणी होत्या. त्यांच्याच घरी इ.स. १९४७ मध्ये शारदा कबीर आणि बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट झाली, त्यावेळी राव यांनी त्या दोघांची एकमेकांशी ओळख करून दिली.....☘
🌹 विजयादशमी (दशहरा) १४ ऑक्टोबर १९५६ या दिवशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सवितामाई आंबेडकर यांच्यासह बुद्धांच्या धम्माची दिक्षा घेतली.....👍🌹🌹
🌹धर्मांतर सोहळ्यानंतर काही आठवड्यातच ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेब महापरिनिर्वाण झाले.....😢 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर त्यांच्या काही अनुयायांनी सविताबाईंवर आंबेडकरांची दुखण्यामध्ये योग्य काळजी घेतली नसल्याचे आणि त्यांनी आंबेडकरांना विषप्रयोगाने मारल्याचे आरोप केले. या आरोपांची चौकशी करण्यासाठी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तज्ज्ञांची एक समिती नेमली. समितीने माईसाहेब आंबेडकरांना सर्व आरोपांतून मुक्त केले....☘
🌹बाबासाहेबांच्या निधनानंतर माईंना राज्यसभेवर घेण्याचा निर्णय जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी घेतला होता. परंतु काँग्रेसच्या पाठींब्यावर आपण राज्यसभेचे सदस्य होणं हे बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणारं ठरणार होतं . म्हणू तीनही वेळा नम्रपणे त्यांनी त्याला नकार दिला....👍🌹🌹
🌹बाबासाहेबांच्या काही सहकाऱ्यांनी आणि जवळच्या अनुयायांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. पण दलित पँथरच्या चळवळीतल्या तरुण कार्यकर्त्यांनी माईंना आदरानं वागवलं, सन्मान दिला. बाबासाहेबांच्या निधनानंतर डॉ. माईसोबत आंबेडकर दिल्लीत मेहरोलीच्या फार्म हाऊसमध्ये राहू लागल्या. दलित पँथरच्या काही लोकांच्या आणि रामदास आठवले, गंगाधर गाडे यांच्यासारख्या काही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तरुण सदस्यांच्या आग्रहाने माईसाहेब दलित चळवळीच्या मुख्य प्रवाहात येत होत्या. मात्र वाढत्या वयामुळे व ढासळत्या प्रकृतीमुळे त्यांना ते फार काळ जमले नाही....☘
🌹 "रिडल्स इन हिन्दुइम" पुस्तकाबद्दलच्या आंदोलनात तीने महत्त्वाची भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना सन्मान मिळाला व दलितांच्या मनातले किल्मिष दुर झाले.....☘
🌹 *घटना निर्मिती, धर्मांतरात मोलाची साथ*.....👍🌹🌹
भारत सरकारचे पहिले कायदामंत्री बाबासाहेब आंबेडकरांबरोबर त्या दिल्लीत राहू लागल्या....👍🌹 माईंची ही साथ बाबासाहेबांच्या 'राज्यघटना' निर्मितीच्या कामात आणि धर्मांतराच्या कार्यात मोलाची ठरली. या काळात माईंनी बाबासाहेबांच्या तब्येतीची काळजी घेतली नसती तर बाबासाहेबांनी हाती घेतलेलं कार्य तडीस जाणं अवघड होतं....👍 त्यासाठी माईंनी बाबासाहेबांच्या कट्टर कार्यकर्त्यांची नाराजीही ओढवून घेतली. त्याचा फटका माईंना बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर बसला. उच्चविद्याविभूषित माईंनी अस्पृश्य म्हणून हिणवल्या जाणाऱ्या जातीतील डॉ. आंबेडकरांशी केलेला विवाह ही त्या काळातली खुप मोठी समाज क्रांती होती.....👍🌹 तो आदर्श आंतरजातीय विवाह ठरला. परंतु त्यानं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आप्त-अनुयायी दुखावले होते. परिणामी बाबासाहेबांच्या निधनानंतर उपेक्षेचं जिणं माईंच्या नशिबी आलं. ज्यांना सूड घ्यायचा होता त्यांनी माईंनाच बाबासाहेबांच्या मृत्यूला जबाबदार धरणारी अफवा उठवली.....😰
माईंनाच बाबासाहेबांच्या मृत्यूला जबाबदार धरणारी अफवा उठवली. त्यामुळं बाबासाहेब हयात असताना बाबासाहेबांकडील पाहुणचार झोडण्यात, त्यांच्याबरोबर समारंभात जाण्यास प्रतिष्ठेचं मानत ; तेच माईंच्या माहेरकडील लोक माईंवरील किटाळाचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून माईंना टाळू लागले. इतकंच नव्हे तर त्या किटाळाला पूरक ठरणाऱ्या गोष्टी पेरू लागले....☘
🌹डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातेवाईकांनी तर त्यांना कधीच आपलं मानलं नाही. १९७२पर्यंत माई दिल्लीतील नेहरोली भागात एकाकी जीवन घालवत होत्या. त्यानंतर दलित पँथरच्या चळवळीने जोर धरला तसं राजा ढालेंनी त्यांना मुंबईत आणलं. तिथं त्या भावाकडे दादरला राहत होत्या. त्यानंतरच्या काळात त्या बेस्ट बसेस मधून प्रवास करताना अनेकांना दिसल्या. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्या बळकट होत्या , तोपर्यंत बाबासाहेबांच्या स्वाभिमानाला साजेल अशा हिंमतीने त्या परिस्थितीला सामोऱ्या जात होत्या....☘👍
🌹त्यांच्या नातेवाईकांपैकी कुणीही हलाखीच्या फेऱ्यात जखडलेला नाही. बहिणींची घरं तर करोडपती , उद्योगपती आहेत. पण माईंना दिल्लीत जेव्हा अपघात झाला तेव्हा अपघाताची माहिती समजूनही कुणी दिल्लीला धडकलं नाही. त्यानंतर मुंबईत असताना त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. बाबासाहेबांच्या विचारांमुळे माईंचं निकटवर्ती झालेल्यांनी त्यांना दादरच्या शुश्रूषा हॉस्पिटल्स मध्ये दाखल केलं. त्याची माहिती आप्तांना दिली, पण कुणीही आलं नाही. त्यांची एक श्रीमंत बहीण हॉस्पिटलच्या तळमजल्यावर आली, पण प्रकृतीच्या अस्वास्थाचं कारण देऊन तिनं तिसऱ्या मजल्यावर उपचार घेणाऱ्या माईंना भेटण्याचं टाळलं......☘
🌹माईंचं इंग्रजीवरचं प्रभुत्व कमालीचं थक्क करणारं होतं....👍🌹🌹 ते त्यांनी बाबासाहेबांच्या सहवासात कमावलेलं होतं. डॉ. आंबेडकर यांच्या निधनानंतर माईंना डॉक्टरी व्यवसाय करणं कठीण नव्हतं. तो केला असता तर त्यांनी करोडो रुपये कमावले असते. वृद्धत्वातली फरफटही त्यामुळं टळली असती. पण बाबासाहेबांच्या जीवन वैभवावर ओरखडाही उमटणार नाही, असं आयुष्य त्यांनी स्वीकारलं. वयाची नव्वदी त्यांनी पार केली होती. त्यातली शेवटची ४५वर्षं तर त्यांचा प्रवास एकटीचाच होता. तो त्यांनी पतीनं दाखवलेल्या
बौद्धधर्माच्या वाटेवरून पार केला....🙏. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारकार्यातला जिवाभावाचा अखेरचा दुवा म्हणजे माईसाहेब आंबेडकर! त्यांचं जीवन हे अस्वस्थ करणारं होतं. आज या माऊलीची जयंती आहे. या माऊलीला विनम्र अभिवादन 🙏या माऊलींचीही आठवण करणं गरजेचं वाटलं म्हणून हा लेखन प्रपंच!
*जयभिम*🙏🙏🙏