ठाणे :- करोना विषाणू तसेच हवेमधून पसरवणाऱ्या अन्य जंतुसंसर्ग आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणती काळजी घेण्यात यावी याबाबत ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने पालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी एकदिवशीय मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे करण्यात आले. डॉ.मिलिंद उबळे व डॉ. डेस्मा यांनी उपस्थित सर्वाना मार्गदर्शन केले.
करोना आजाराबाबत सध्या सर्वत्र गैरसमज पसरत आहे. चीनमधील करोना विषाणू बाधित क्षेत्रामधून येणाऱ्या प्रवाशांमध्ये अथवा करोना विषाणू रुग्णाच्या संपर्कात आल्यास या आजाराची शक्यता उदभवू शकते. करोना विषाणूजन्य आजार भारतात पसरु नये यादृष्टीने चीनमधून भारतात येत असलेल्या सर्व प्रवाशांचे विमानतळावर स्क्रिनिंग करण्यात येते. करोना विषाणू हा हवेमार्फत पसरतो. ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना करोना विषाणु संक्रमणापासून बचाव करण्यासाठी उपाय योजनांची माहिती मिळावी यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे सुष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.मिलिंद उबळे व लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयाच्या अधिव्याख्याता डॉ. डेस्मा यांनी उपस्थित सर्वाना मार्गदर्शन केले.
क्षयरोगासारखे हवेद्वारे पसरणाऱ्या जंतसंसर्ग आजारांपासून बचावाकरीता 'हवाजनित संसर्ग नियंत्रण' उपाययोजनांची गरज आहे. याकरीता महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना वैयक्तिक व कामाच्या ठिकाणी कोणत्या उपाययोजना कराव्यात याचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेला कर्मचाऱ्यांनी उत्फुर्त दिला.