जिल्हा परिषदेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न. खेळातून मिळणारा आनंद पगारापेक्षा अधिक ,.राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील.

ठाणे :- नरेंद्र कसबे.
ठाणे - :  दैनदिन कामकाज करताना सरकारी अधिकारी- कर्मचारी यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. यासाठी एखादा आवडीचा खेळ खेळायला हवा. खेळातून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होता येत. त्यामुळे निरोगी आयुष्य जगण्याची  गुरुकिल्ली खेळ असून महिन्याला मिळणाऱ्या पगारापेक्षा खेळातून मिळणारा आनंद जास्त असल्याचे मत राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले. ठाणे जिल्हा परिषद अधिकारी - कर्मचारी वार्षिक क्रीडा स्पर्धा मावळी मंडळाच्या क्रीडांगणावर अतिशय उत्साहाच्या वातावरणात आज संपन्न झाल्या. यावेळी  त्यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.


यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, कृषि-पशू,दुग्धशाळा समिती सभापती किशोर जाधव, समाजकल्याण सभापती संगीता गांगड, जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत, उल्हास बांगर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि.नेमाने, प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन ) डी. वाय.जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) चंद्रकांत पवार,  उप मुख्य कार्यकारी ( स्वच्छता व पाणी ) छायादेवी सिसोदे, आदि मान्यवर उपस्थित होते.


याप्रसंगी पुढे बोलताना श्री. पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या क्रीडा स्पर्धेतून अधिकारी-कर्मचारी यांना वर्षातला एका दिवस पुन्हा तारुण्यातले दिवस अनुभवायला मिळतात.त्यामुळे या स्पर्धांना खूप महत्व असल्याचे सांगितले. शिवाय श्री. पाटील यांनी नुकताच राज्य सरकारने राज्य शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा केलेला आठवडा या निर्णयाचे स्वागत करत राज्य सरकारला धन्यवाद दिले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील यांनी खेळाडूना शुभेच्छा दिल्या. तर मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे  यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की. जिल्हा परिषद कर्मचारी हा जिल्हा परिषदेचा कणा आहे. वर्षभर विविध कार्यालयीन कामात व्यस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केवळ एकदिवशीय  क्रीडा स्पर्धा न भरवता पुढील वर्षापासून तीन दिवसांची क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येईल अशी घोषणा करत कर्मचाऱ्यांसाठी खेळ का आवश्यक आहे याचे महत्व भाषणात अधोरेखित केले.


या स्पधेत पाच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मुख्याल्यातील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. सांघिक स्पर्धेत एकूण आठ संघ तयार करण्यात आले होते. यावेळी महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र सांघिक आणि वैयक्तिक स्वरूपाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये क्रिकेट, कब्बडी, लंगडी, गोळा फेक, शंभर मीटर धावणे, बुद्धिबळ, कॅरम, तीन पायांची शर्यत आदि स्पर्धासह ५० वर्षावरील अधिकारी-कर्मचाऱ्यासाठी देखील विविध स्पर्धांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते.


या स्पर्धाचे बक्षीस वितरण सायंकाळी संपन्न झाले. महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेच्या बक्षिस सोहळ्यासाठी शहापूर पंचायत समितीच्या सभापती सोनल शिंगे उपस्थित होत्या.  या स्पर्धेत पंचायत समिती गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन ) डी. वाय. जाधव यांनी आभार व्यक्त केले.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image