दिव्यांगांच्या जिद्दीला सलाम करण्यासाठी ठाण्यात रंगणार ठाणे महापौर चषक दिव्यांग कला क्रीडा महोत्सव


ठाणे, ता. 18 : व्यंगत्वावर मात करुन शाळांमध्ये,विविध केंद्रामध्ये शिक्षण घेणा-या दिव्यांग विद्यार्थी व व्यक्तींमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने महापौर नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून दिव्यांग कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 24 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत ठाणे महापौर चषक दिव्यांग कला क्रीडा महोत्सव आयोजित केला असून या महोत्सवात दिव्यांग शाळा व केंद्रांनी आपल्या विद्यार्थ्यांना आवर्जुन सहभागी करावे असे आवाहन महापौरांनी केले आहे.


            या महोत्सवाचे उद्घाटन 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.00 वाजता महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार असून उपमहापौर पल्लवी कदम,  स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्ष नेत्या ‍ प्रमिला केणी तसेच सर्व नगरसेवक उपस्थीत राहून या दिव्यांग मुलांच्या कलागुणांचे कौतुक करणार आहेत.


            दिव्यांग कला क्रीडा महोत्सवात गतीमंद, कर्णबधीर, अस्थीव्यंग विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांमध्ये  50 मीटर धावणे, 50 मीटर रिले, गोळाफेक या स्पर्धां ठेवण्यात आल्या आहेत. तसेच सर्व दिव्यांगासाठी बादलीत चेंडू टाकणे ही स्पर्धा  24 फेब्रुवारी  तर चित्रकला व हस्तकला या स्पर्धा 25 फेब्रुवारी  रोजी धर्मवीर मैदान, बारा बंगला, कोपरी, ठाणे पूर्व येथे होणार आहेत. कला विभागात एकेरी नृत्य, समूह नृत्य, एकेरी गायन या स्पर्धांचा समावेश असून या स्पर्धा 26 फेब्रुवारी रोजी राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार आहेत.  या महोत्सवातील सर्व स्पर्धांमध्ये प्रथम,  द्वीतीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तर दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्साह  वाढविण्यासाठी स्पर्धेत सहभागी होणा-या  स्पर्धकाला आकर्षक बक्षीसे दिली जाणार असल्‌याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.


            दिव्यांग विद्यार्थी आपल्या व्यंगत्वावर मात करीत ‍ शिक्षण घेत आहेत, या विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी विशेष मेहनत शाळा व केंद्रचालक घेत असतात, या विद्यार्थ्यामधील कलागुण समाजासमोर यावेत तसेच त्यांचा आतमविश्वास वाढावा यासाठीच या विशेष ठाणे महापौर चषक दिव्यांग कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन ठाणे महापालिकेच्या माध्यमातून केले आहे. सर्व शाळा व केंद्रांनी आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने या महोत्सवात सहभागी करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी स्पर्धेचे समन्वयक किरण नाक्ती यांच्याशी 9819129277 या क्रमांकावर संपर्क साधावा.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image