अजितदादा आपण इतकी वर्ष उगाच वेगळे राहिलो – मुख्यमंत्री*

 


मी आणि अजितदादा कार्यक्रम पाहात होतो. तेव्हा एक कार्यकर्ता मला वळूनवळून सांगत होता दादांना सांभाळा. त्यावर मी आता उत्तर देतो. अहो अजितदादा आपण एवढी वर्षे मधली आपण उगाच घालवली. उगाचच इतकी वर्षे वेगळं राहिलो. आधीच एकत्र यायला हवे होते. आता जे एकत्र आलो आहोत ते चांगल्या आणि विधायक कामांसाठी एकत्र आलो आहोत. आता जे चांगलं आहे ते करुन दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही अशी शपथ छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊंच्या साक्षीने घेतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.


 महाविकास आघाडीचं सरकार हे माझं सरकार आहे ही भावना आज प्रत्येक गोर-गरीबांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळेच आज शिवजन्माच्या सोहळ्याचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्याला गर्दी झाली आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे हे भाषण करत होते त्याचवेळी जमलेल्या गर्दीपैकी एकजण ओरडून म्हणाला ते शिवस्मारकाचे लवकर बघा. त्यावरही उद्धव ठाकरेंनी हसून दाद दिली आणि म्हणाले “होय सगळं बघतो. आज लोकांचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे काळजी करु नका. शिवनेरी आणखी कशी सजावयची याकडे आम्ही लक्ष देतो आहोत. हे आपलं वैभव आहे”असंही उद्धव ठाकरे म्हणाले.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image