ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सेवानिवृत्त १८९ प्राथमिक शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ देण्यात आला आहे. तर २९८ प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडश्रेणी (24वर्ष) व वरिष्ठ वेतनश्रेणी (12वर्ष ) असा एकूण ४८७ प्राथमिक शिक्षकांना लाभ मिळाला आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी माहिती दिली.
ज्या शिक्षकांची सेवेची २४ वर्ष पूर्ण झाली आणि ज्या शिक्षकांची सेवेची १२ वर्ष पूर्ण झाली आहेत अशा प्राथमिक सेवानिवृत्त आणि सेवा बजावत असणाऱ्या शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या निवड समितीने शासन निर्णयातील तरतुदी प्रमाणे निकषात बसणाऱ्या शिक्षकांना लाभ दिला.
निवड श्रेणी मिळाले शिक्षक हे सेवानिवृत्त आहेत त्यामुळे सेवानिवृत्ती नंतर मिळणाऱ्या पेन्शनमध्ये या लाभाचा फायदा होणार आहे. तर वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाले कार्यरत शिक्षक असून या शिक्षकांना देखिल वेतनात वाढ होणार आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळा हा ग्रामीण-आदिवासी भागात वसल्या आहेत. जिल्हा परिषदेचे शिक्षक तन्मयतेने शिकवण्याचे कार्य करतात. प्रत्येक शिक्षकाला शासनाच्या धोरणानुसार असणारे लाभ मिळायल्या हवेत. त्यानुसार शासनाच्या धोरणानुसार निवड श्रेणी आणि वरिष्ठ वेतन श्रेणीचे लाभ ४८७ प्राथमिक शिक्षकांना देण्यात आले.
हिरालाल सोनवणे
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे