ठाणे :- ठाण्यातील चौदा वर्षीय रेनी शर्मा या चिमुरडीने शोतोकॉन या कराटे प्रकारात आंतरराष्ट्रीय ग्रँड चॅम्पीयनशीप पटकावली आहे. विशेष म्हणजे, या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी अमेरिकेतून आलेले गॅ्रंड मास्टर केविन फुनाकोशी यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले. रेनीच्या या कृतृत्वामुळे ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
अंधेरी स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये इंटरनॅशनल शोतोकॉन कराटे डो ऑगनायशेजन या संस्थेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जगभरातील सुमारे 700 च्या आसपास कराटेपटू सहभागी झाले होतेे. या स्पर्धेत सलाउद्दीन चाऊस यांच्याकडे प्रशिक्षण घेणार्या ठाण्याच्या युनिवर्सल शोतोकॉन कराटे असोशियनची विद्यार्थिनी रेनी हिने काता-कुमितो कराटे प्रकारात 2 सुवर्ण पदके पटकावली. तसेच, 50 किलो वजनी गटात आंतरराष्ट्रीय ग्रँड चॅम्पीयनशीप पटकावली आहे. अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय ग्रँड चॅम्पीयनशीप पटकावणारी ती महाराष्ट्रातील पहिलीच शोतोकॉन कराटे पटू ठरली आहे.
ठाणेकर चिमुरडीने पटकावली शोतोकॉनची ग्रँड चॅम्पियनशीप