स्वयंघोषीत माहाराजांचं समर्थन किती करायचं हा समाजाच्या दृष्टीने " विषवल्ली "
पोसण्या सारखं सारखं वआहे. बरं या तथाकथित महाराजांचं इतकं पीक आले आहे की एवढी मशागत तुम्ही शेतात केली तर भारत प्रचंड प्रमाणात अन्नधान्याची निर्यात करील. बरं या महाराजांच्या अब्जावधी रुपयांच्या प्रापर्टी हाही एक चिंतनाचा विषय आहे
मणुष्यबला चा विचार केला तर किती काळ आणि शक्ती वाया जाते
याचा कोणी विचार केला नाही. धर्म,देव,परमार्थ,
आध्यात्मिक जिवन हे सर्व मान्य आहे आंम्हाला
याचा अर्थ असा होत नाही
बरं हे नकली महाराज करतात काय तर
आमच्या साधुसंतानी जे ग्रंथ लिहिले त्याचा आधार घेऊन व वर्तमान काळातील काही साधर्म्य असलेल्या प्रसंग आणि त्यांशी साधर्म्य असलेले
उदाहरण देतात सामान्य माणसाला ते खरं वाटतं
आरे बाबानो ग्रंथ सोडले तर तुमचं योगदान काय
साधुसंतानी हे ग्रंथ समाजप्रबोधनासाठी निस्वार्थपणे आपलं आयुष्य वेचून पुढील पीढी च्या उत्कर्षासाठी लिहिले आहेत आज त्याच ग्रंथांचा आधार घेऊन हे नकली महाराज अमाप पैसा कमावून आपल्या दहा पिढ्यांची सोय करून ठेवता हा प्रश्न कुणीच विचारीत नाहीत.एवढी अमर्याद संपत्ती असून यांनी कधी अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या आणि. - 40 डिग्री तापमानात रक्षण करणार्या जवानांना कधी मदत केल्याचं आठवत नाही. आणि याच नकली महाराजांच्या रक्षणासाठी
आमचे कमांडो डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून असतात. आणि यांचे हे धंदे पाहून कुण्या भक्तगणाची संख्या कमी झाली ना ही महासत्ते कडे
चाललेल्या भारता साठी
चिंतेची बाब आहे. हे वेगळे सांगायला नको.
बघा बाबानो पटतंय का?
🍁🙏🏻🍁
भारताती भिकारी आणि
हे सर्व भोंदूबाबा माझ्याकडे द्या मी तुम्हाला पोटभर अन्न मिळवून देतो
हे उद्गार आहेत
" डाॅ. अॅनी बेझंट "
या कर्तव्यदक्ष महीलेच
स्वयंघोषीत माहाराजांचं समर्थन किती करायचं हा समाजाच्या दृष्टीने " विषवल्ली