ठाणे :- नरेंद्र कसबे.
ठाणे :- ठाणे जिल्ह्यातील 10 मयत कर्मचाऱ्याच्या वारसांना शासकीय सेवेत सामावुन घेण्यात आले आहे. या सर्व वारसांना नियुक्तीपत्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आज देण्यात आले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवाजी पाटील,उपजिल्हाधिकारी अभिाजित भांडे,चिटणीस राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.नार्वेकर यांनी कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबींचा तातडीने निपटारा करण्याच्या सुचना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांना दिल्या होत्या.त्यानुसार सर्व यंत्रणेने प्राधान्याने या सर्व बाबींची पुर्तता केली.
जिल्हाधिकारी ठाणे आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांचे स्थायी आदेश,आश्वसित सेवा योजनेअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे 10,20,30, वर्षाचे लाभ पात्र कर्मचाऱ्यांना देण्यात आले.
कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविल्याबदल ठाणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटने जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले. जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चांगले काम करावे असे आवाहन श्री. नार्वेकर यांनी या वेळी केले .