नव्या वर्षाची सुरुवातच जगाला धक्का देणाऱ्या आजारानं झाली. आरोग्याला | असलेला हा धोका फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही आहे. त्याला कारणीभूत आहे कोरोना व्हायरस या नावानं ओळखल्या जाणाऱ्या आणि चीनमधून जगभर सर्वत्र फैलावत चाललेल्या विषाणूचा संसग. या विषाणूने दीडशेपेक्षा जास्त बळी घेतले आहेत. गेल्या वर्षाच्या अखेरीपासूनच चीनमध्ये एका भयावह तापाची सुरुवात झाली होती, परंतु या वर्षीच्या सुरुवातीपासून हा विषाणू किती भयावह आहे, ते उजेडात आलं. चीनच्या वुहान या शहरात गेल्या डिसेंबरमध्ये न्यूमोनियाची साथ फैलावली.चीनबरोबर थायलंड आणि जपानमध्येही या विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्यामुळे संपूर्ण जग खडबडून जागं झालं. कारण जागतिकीकरणाच्या या काळात अशा प्रकारच्या साथीही सर्वत्र झपाट्यानं पसरतात. या आजाराची गंभीर दखल घेण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे २००२०३ मध्ये चीन आणि हाँगकाँगमध्ये सुमारे ६०० जणांचा आणि जगभरात १०० जणांचा मृत्यू या आजारानं झाला. या तापाला कारणीभूत असलेल्या आणि 'चायना कोरोनो व्हायरस' या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या विषाणूचा फैलाव माणसाकडून माणसाला होतो. त्यामुळे साहजिकच रुग्णांना हाताळणारे कर्मचारी आणि डॉक्टर इत्यादींना याचा सर्वाधिक धोका असतो.
या विषाणूची संसर्गाची ताकद एवढी प्रचंड आहे की सध्या तरी जगभरात इतर कोणत्याही आजारापेक्षा हा आजार भयावह ठरत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (ह) म्हटलं आहे. या विषाणूचं नाव कोरोनोव्हायरस असलं तरीही हा एकच एक विषाणू नाही, हा विषाणूंचा समूह आहे. या विषाणूचा संसर्ग २०१२ पासून लक्षात आला आहे. या विषाणूंच्या समूहाला दोन गटांमध्ये विभाजित केलं जातं. मर्स-सीओव्ही आणि सास. मिडल ईस्टर्न रेस्पिरेटरी सिंड्रोम आणि सार्स म्हणजे सिव्हिअर अॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम. मर्सचा आजार नावाप्रमाणेच मध्य- पूर्वेत अथवा पश्चिम आशियात आढळला, त्याचा पहिला रुग्ण सौदी अरेबियात २०१२ मध्ये सापडला होता. सार्सचे पहिले काही रुग्ण २००३ मध्ये आशियात सापडले होते आणि तिथून जगभर सर्वत्र झपाट्यानं पसरले होते, पण त्याआधी २००४ मध्येही सार्सचे रुग्ण आढळले होते. चीनच्या वुहान इथे डिसेंबर २०१९ मध्ये या विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तो सार्स कोरोनाव्हायरसचा उद्रेक आहे की त्याच्याशी संबंधित इतर प्रकारचा विषाणू आहे याविषयी तातडीनं तपासणीला सुरुवात झाली. सीडीसीच्या अलीकडच्या अहवालांमधून असं स्पष्ट झालं आहे की हा विषाणूही स्वाईन फ्लूप्रमाणेच प्राण्यांच्या शरीरात पहिल्यांदा तयार झाला असून या प्राण्यांचा आहारात समावेश झाल्यानंतर त्याचा मानवी शरीरांत शिरकाव झाला आहे. डिसेंबरपासून चीनमध्ये या विषाणूमुळे येणाऱ्या तापानं १२० जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं चीनमधल्या या विषाणूचा नेमका स्रोत शोधून काढणं महत्त्वाचं असल्याचं स्पष्ट केलं आहे. या विषाणचा फैलाव माणसाकडन माणसाला होत असल्यानं आंतरराष्ट्रीय संघटना आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातली व्यवस्थापनं अधिक चिंताग्रस्त झाली आहेत. लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजमधली एमआरसी सेंटर फॉर ग्लोबल इन्फेक्शस डिसीज अॅनालिसीसनं प्रकाशित केलेल्या लेखात एकट्या वुहान शहरातच या आजाराचे १,७२३ रुग्ण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 'हू' च्या मते, श्वसनाला त्रास होणं. ताप, कफ, धाप लागणं आणि श्वासोच्छवास मंदावणं ही या विषाणूंमुळे होणाऱ्या आजाराची प्रमुख लक्षणं आहेत. अधिक गंभीर रुग्णांमध्ये संसर्गामुळे न्यूमोनियाही होऊ शकतो. शिवाय गंभीर आणि तीव्र स्वरूपाचे श्वसनविषक त्रास, मूत्रपिंड निकामी होणं आणि मृत्यू असे परिणाम दिसून येतात.जगभरातल्या कोरोनाव्हायरच्या रुग्णांना अधिक नेमकेपणानं आणि झटपट शोधून काढण्यासाठी चीननं या रुग्णांचा जीनविषयक अनुक्रम शोधून काढला आहे.