वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना करावी : महापौर

ठाणे : महापालिका कार्यक्षेत्रातील रस्ते व पदपथ हे नागरिकांसाठी असून ते कायमस्वरुपी नागरिकांच्या वापरासाठी मोकळे ठेवावेत असे स्पष्ट आदेश वागळे इस्टेट विभागातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीकोनातून झालेल्या बैठकीदरम्यान महापौर नरेश म्हस्के यांनी दिले. मागील काही महिन्यांपासून वागळे विभागात विशेषत: कामगार हॉसिपटल रोड/ नाका. इंदिरानगर नाका, यशोधननगर. रोड नं. २२ व श्री आईमाता चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्थानिक नागरिक व नगरसेवक यांनी महापौर यांना निवेदन दिले होते. त्यानुसार महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस सभागृह नेते अशोक वैती, शिवसेना गटनेत दिलीप बारटक्के, स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर, नगरसेविका आशा डोंगरे, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे, वाहतूक विभाग, परिवहन विभाग, एमएसईबी तसेच महापालिकेचे अधिकारी व ज्ञानोदय विद्यालय व आर.जे ठाकूर महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक आदी उपस्थीत होते. स्वा. सावरकरनगर विभागामध्ये शाळा व महाविद्यालय असून या ठिकाणी दैनंदिन येणा-या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. एकाच वेळी शाळा सुटत आसल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच वसंतविहार, शास्त्रीनगर, येऊर, उपवन आदी विभागांतील वाहनधारक मुलुंडकडे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करीत असल्यामुळे दिवसभर येथे वाहतूक कोंडी होते. यासाठी एक मार्गी वाहतूक करणेबाबत कार्यवाही करावी असे आदेश या बैठकीत महापौरांनी दिले. तसेच या विभागामध्ये बहुतांश ठिकाणी हातगाड्या, फेरीवाले, गॅरेजवाले रस्ता तसेच फूटपाथवर बसत असल्यामुळे या ठिकाणी मोठ्याप्रमाणात वाहतूकी कोंडी निर्माण होते. हे अतिक्रमण हटविणेबाबत कठोर कारवाई करण्याचेही आदेश यावेळी देण्यात आले. या परिसरात सुरू असलेल्या रसत्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल या दृष्टीने कार्यवाही करुन तुर्तास चौकातील खड्डे बुजविणे व ट्रफिक वार्डनची संख्या वाढविण्याचया सूचना दिल्या. तसेच बहुतांशी रस्तयांवर अनेक दिवसापासून अनधिकृतपणे मोठी वाहने उभी असतात, यावर कारवाई करावी, तसेच वर्षानुवर्षे एकाच जागेवर उभी असणा-या भंगार वाहनांवर कायदेशीर कारवाई करुन ही जागा मोकळी करण्यात यावे असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image