रेल्वेचे खाजगीकरण ; टाटा-अदानी सांभाळणार रेल्वेचा कारभार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात देशात तेजस एक्स्प्रेसप्रमाणे 150 खासगी ट्रेन चालवण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार रेल्वेने देशभरातून 100 मार्गांची निवड केली आहे, ज्यामध्ये मुंबई -दिल्ली तसेच हावडा - दिल्लीसारख्या व्यस्त मार्गांचाही समावेश आहे. दरम्यान, या खासगी ट्रेन चालविण्यासाठी देशी-विदेशी अनेक बड्या उद्योग समूहांनी रस दाखविला आहे. खासगी ट्रेन चालवण्यासाठी मुंबई ते नवी दिल्ली, चेन्नई ते नवी दिल्ली, नवी दिल्ली ते हावड़ा, शालीमार ते पुणे, नवी दिल्ली ते पाटणा अशा काही मार्गांची निवड करण्यात आली आहे. खासगी ट्रेन चालविण्यात रस दाखविणाऱ्यांमध्ये अल्स्टॉम ट्रान्सपोर्ट, बॉम्बार्डियर, सीमेंस एजी, ह्युंदाई रोटेम कंपनी आणि मॅकक्वेरी यासह अनेक जागतिक दर्जाच्या कंपन्यांचा समावेश आहे. तर देशांतर्गत कंपन्यांमध्ये टाटा रियल्टी अँड इंफ्रास्ट्रक्चर, हिताची इंडिया आणि साउथ एशिया, एस्सेल ग्रुप, अदानी पोर्ट्स आणि सेझ (एसईझेड), भारतीय रेल्वे केटरिंग अॅड टुरिझम कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे.या प्रायव्हेट ट्रेन 16 डब्यांच्या असतील आणि त्यांचा वेग दरताशी 160 कि.मी. इतका असेल. या गाडय़ांच्या भाडेरचना आणि मेन्टेनन्सची जबाबदारी प्रायव्हेट कंपन्यांवरच असणार आहे. एका अहवालानुसार देशातील 100 भारतीय रेल्वे मार्गावर 150 खासगी गाड्या चालविण्यासाठी सुमारे 22,500 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीची आवश्यकता आहे. खासगी कंपन्यांना थोडा दिलासा देण्यासाठी खासगी ट्रेन सुटण्याच्या निर्धारित वेळेच्या 15 मिनिटांमध्येइतर कोणतीही नियमित धावणारी रेल्वे सुटणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. खासगी कंपन्या भाडे व थांबे निश्चित करण्यासाठी तथा भारतीय रेल्वेच्या मानकांनुसार कोणत्याही कंपनीकडून कोच व इंजिन खरेदी करण्यासस्वतंत्र असतील.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image