प्रभाग ५ मध्ये लोकउपयोगी विकासकामांचा शुभारंभ

ठाणे - प्रभाग क्रं. ५ मधील स्थानिक नगरसेविका | परिषा सरनाईक यांच्या नगरसेवक निधीतून व ठाणे  महानगरपालिका यांच्या माध्यमातून प्रभाग क्रं. ५ मधील विविध विभागांमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे भुमिपूजन सोहळा, शौचालयाचे उदघाटन समारंभ, १२ जलवाहिनी टाकणे या कामांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रभाग क्रं. ५ मधील येऊर येथील ओपन जिमच्या बाजूला नव्याने बांधण्यात आलेल्या शौचालयाचे उदघाटन, गणेश नगर येथील शौचालयाचे उदघाटन, शिवाई नगर येथील स्त्याचे यु. टी. डब्ल्यू टी. अंतर्गत काँक्रीटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा तसेच आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून गावंड बाग येथील १२ जलवाहिनी टाकण्याच्या कामा यावेळी संपन्न झाले. प्रभागातील या विकास कामांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आता समाधान व्यक्त केले आहे. सदर भूमीपूजन सोहळा आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी नगरसेविका परिषा सरनाईक, नगरसेविका जयश्री डेव्हिड, नगरसेवक नरेन्द्र सुरकर, एअर कमांडर संजय वर्मा, शिवसहकार सेना अध्यक्ष संदीप नटे, उपविभाग प्रमुख प्रमोद जाधव, चंद्रकांत गावकर, शाखाप्रमुख कुंदन घोसाळकर, रमेश जाधव, ज्येष्ठ नागरिक, तसेच स्थानिक नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image