मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यात विविध योजनांचा शुभारंभ व लोकार्पण घरांच्या योजनेत दहा टक्के घरे पोलीसांसाठी -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

ठाणे -: महाराष्ट्रातील शासकीय घरांच्या योजनेत दहा टक्के घरे पोलीसांसाठी राखीव ठेवण्यात येतील.ठाणे शहरांचे रुप बदलले पंरतु ठाणेकर जनता आजही साधीसुधी आणि प्रेमळ आहे. ठाणेकरांच्या सर्वांगिण विकासासाठी वचनबद्ध असल्याचे  उद्गगार महाराष्ट्राचे मुंख्यमत्री श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले.  आज ठाणे महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमाच्या भूमीपूजन आणि उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.  या कार्यक्रमास एकनाथ शिंदे, पालकमंत्री तथा नगर विकास ,सार्वजनिक बांधकाम, श्री.जितेंद्र आव्हाड,मंत्री, गृहनिर्माण. श्री.आदित्य ठाकरे पर्यटन व पर्यावरण मंत्री. महापौर नरेश म्हस्के,  खा.राजन विचारे,आ.प्रताप सरनाईक, विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.  तीन हात नाका येथे उभारण्यात आलेल्या हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्यदिव्य स्मारकाचे लोकार्पण, समुह विकास योजनेच्या(क्लस्टर योजना) पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाचा भूमीपूजन सोहळा मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाला,ठाणे महानगरपालिकेच्या ‘ पथदर्शी विकासाची ठाणे’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन ,ठाणे ग्लोबल इम्पॅक्ट हब ई – उदघाटन संकेतस्थळाचे अनावरण कंमाड ॲण्ड कंट्रोल सेंटर ठाणे ई –उदघाटन ,हाजुरी येथील क्लस्टर योजनेचे ई- भूमीपूजन ,स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत कळवा- पारसिक, कोलशेत,वाघबीळ,बाळकूम-साकेत, कोपरी,शास्त्रीनगर, नागलाबंदर खाडी किनारा विकास प्रकल्पांचे ई- भूमीपूजन, हिदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ‘ आपला दवाखाना ’ई-शुभारंभ, घनकचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाचे ई – भूमीपूजन, बांधकाम व तोडफोड कचरा पुर्नप्रक्रिया केंद्राचे लोकार्पण, शहरी जंगले  प्रकल्पाचे ई- भूमीपूजन, विज्ञान केंद्र  प्रकल्पाचे ई- भूमीपूजन , ‘लाडकी लेक ’ दत्तक योजनेतील लाभर्थ्याना अनुदान वाटप मा.मुख्यमंत्री यांच्या हस्ते आज करण्यात आले. समुह विकास योजनेच्या(क्लस्टर योजना) पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाचा भूमीपूजन सोहळा मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाला   मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की, नागरी समूह विकास योजनेमुळे पक्की घरे मिळणार आहेत. ठाणे शहराचे रुप बदलते आहे .नवीन ठाणे शहर पाहतांना आजच्या दिवशी मला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांची आठवण होते. घरांच्या सर्व योजनांत पोलीसांसाठी घरे राखीव ठेवण्यात येतील . ठाणेकर जनतेने मला नेहमीच प्रेम दिले आहे. आपल्या सर्वांमुळे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो आहे असेही ते म्हणाले.  प्रास्ताविकात महापौर नरेंद्र म्हस्के यांनी सांगितले की, ठाणे शहराचा विकास वेगाने सुरु आहे. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने  प्रकल्प महानगरपालिकेस भविष्यात  मिळावेत.  नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे  म्हणाले की, श्रीयुत उध्दव ठाकरे साहेब मुख्यमंत्री म्हणून ठाणे शहरात प्रथमच येत आहेत. त्यांचे मी पालकमंत्री म्हणून  स्वागत करतो.  ठाण्यातील धोकादायक पोलीस वसाहतीचे पुर्ननिर्माण करण्याची आवश्यकता आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व भागात एसआरए योजना राबविण्याची आवश्यकता आहे. स्लम फ्री सिटी योजना सर्वत्र राबविण्याची गरज आहे.धोकादायक व अनाधिकृत इमारतीच्या बाबत भेदभाव केला जाणार नाही, मुंबई महानगर क्षेत्रातील अशा इमारतींचा समूह विकास योजनेंतर्गत विकास करणार आहे. तसाच क्लस्टर चा ठाणे पॅर्टन सर्वत्र राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, समूह विकास योजनेची सुरुवात मुंब्रा पासून झाली .गावठाण व कोळीवाडा यांना या योजनेतून न्याय दयावा.एसआरएअंतर्गत मुंबई प्रमाणे ठाण्यातही 300स्वेअर फूटाचे  घर देण्यात यावे. समूह विकास योजनेत मुळ भूमीपुत्रांना न्याय मिळावा.  ठाणे जिल्हयात उपलब्ध असलेल्या 27 एकर भूखंडावर मनपाच्या वतीने  पक्षी अभयारण्य उभारण्यात  यावे असे ही ते म्हणाले. सदनिक स्टॉलचे वाटप  महापालिका क्षेत्रातील दिव्यांगाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध योजना राबविण्यात येत असून यामध्ये प्रतिनिधीक स्वरुपात बीएसयुपी योजनेंतर्गत सदनिका वाटप व रोजगारासाठी स्टॉलचे वाटप करण्यात आले.अनाथ, निराधार, निरश्रीत बालके तसेच एचआयव्ही बाधित पालकांची मुले  यांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदतीची तरतूद असलेल्या योजनेतील  लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरुपात अनुदान वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने  उपस्थित होते.



Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image